अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:57 PM2019-05-18T22:57:07+5:302019-05-18T23:01:05+5:30

तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले.

Youth Need Ashtangik Marg, Arya Satya : Phra Dhammaanang | अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

अष्टांगिक मार्ग, आर्य सत्याची युवा पिढीला गरज : फ्रा धम्मनांग

googlenewsNext
ठळक मुद्देदीक्षाभूमीवर श्रामणेर शिबिराचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारसरणीची, त्यांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाची व आर्य सत्याची गरज आजच्या युवा पिढीला जास्त आहे. बुध्दाच्या या शिकवणीचा, त्यांच्या विचारप्रणालीचा, प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिर महत्त्वाचे ठरते, असे मार्गदर्शन थायलंड येथील फ्रा धम्मनांग यांनी येथे केले. 


तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने वाट थाई सिरीराजगीर, नालंदा यांच्यावतीने विश्व मैत्रेय बुद्धिस्ट संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समिती व सूजाता बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १८ मे दरम्यान श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचा ससमारोप शनिवारी दीक्षाभूमीच्या परिसरात सायंकाळी झाला. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर थायलंड येथील फ्रा सरीत काय, फ्रा आर्यमिता, भदन्त विरीयज्योती, भदन्त नागघोष, भदन्त नागवंश, स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे आदी उपस्थित होते.
अष्टांगिक मार्ग हा मनुष्याला पाहायला शिकवतो, जाणायला शिकवतो, ज्ञान देतो. त्यामुळे चित्ताला शांती लाभू शकते. मनुष्याच्या दैनंदिन जीवनात मनुष्य जितकी या मार्गाने वाटचाल करील तितके जीवन अधिक आनंदी होत जाईल, असे मार्गदर्शन भदन्त नागघोष यांनी केले. भदन्त नागवंश म्हणाले,
बौद्ध धम्माच्या शिकवणुकीत अष्टांगिक मार्गाला फार महत्त्व आहे. अष्टांगिक मार्गाचा परिपूर्ण अवलंब केला तर मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो. निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ही कल्पना समजावून देताना म्हटले आहे की, निर्वाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा ताबा आपल्या प्रवृत्तींवर असणे. निब्बाण (निर्वाण) म्हणजे निर्दोष जीवन. काम, क्रोध, द्वेष वगैरे दोष आपले जीवन दूषित करून सोडतात. हे दूर करून जीवन निर्मळ करण्याचा मध्यम मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
संचालन निर्वाण शिंदे यांनी केले तर आभार शरद मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रशांत ढेंगरे, इंद्रपाल वाघमारे, निर्वाण शिंदे, विलास गजघाटे, शरद मेश्राम, विशाल कांबळे, यशवंत चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. दरम्याण श्रामणेर शिबिरात सहभागी झालेल्यांनी दीक्षाभूमीच्या परिसरात मेणबत्ती हातात घेऊन बुद्धं, सरणं, गच्छामीच्या निनादात रॅली काढली.

Web Title: Youth Need Ashtangik Marg, Arya Satya : Phra Dhammaanang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.