इंदिरा गांधी यांच्या त्यागातून युवकांनी प्रेरणा घ्यावी : विकास ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:39 PM2019-11-19T23:39:21+5:302019-11-19T23:41:37+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सेवा केली. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी सोमवारी केले. इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवक आघाडीतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही इतवारी शहीद चौक येथून मोठ्या उत्साहात सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
संस्थेचे प्रमुख पिंटू बागडी यांनी प्रास्ताविकातून मागील ३३ वर्षापासून आकर्षक चित्ररथासह काढण्यात येत असलेल्या सद्भावना रॅलीची माहिती दिली. रॅली इतवारी येथून निघाल्यानंतर शहरातील विविध भागातून फिरली. यावेळी विकास ठाकरे, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री,कमलेश समर्थ, गिरीश पांडव, संजय महाकाळकर, डॉ गजराज हटेवार, महेश श्रीवास, हसमुख सागलानी, रवी गाडगे पाटील, , उमेश शाहू, जयंत लुटे,रिंकू जैन, अंकुश बागडी आदी उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाला मजबूत करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या दूर करण्याचा संकल्प करा, हीच इंदिरा गांधी यांना खरी आदरांजली होईल. असे आवाहन विकास ठाकरे यांनी केले. अतुल कोटेचा म्हणाले, इंदिरा गांधी यांनी गरिबांसोबतच देशाची सेवा केली. यामुळे त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात आपले वेगळे स्थान निर्माण के ले. रॅलीच्याआयोजनाबाबत कोटेचा यांनी बागडी यांचे अभिनंदन केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बाभूळगाव बँड, मंदलदिप बँडच्या कलावंतांनी सर्वांची मने जिंकली. सराफा बाजार, इतवारी मित्रमंडळ व जागनाथ रोड व्यापारी संघाने रॅलीचे स्वागत केले.
तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, नगरसेवक, राष्ट्रीय युवक आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन महामंत्री रिंकू जैन यांनी तर आभार अंकुश बागडी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी सुरेश अग्रेकर, युवराज श्रीरंग, मोंटी गंडेचा, हर्षित भंसाळी,पुरु षोत्तम शर्मा, मुन्ना लखेटे, गोपाल पट्टम, इरशाद शेख, अशोक जर्मन, मोतीराम मोहाडीकर, गुल्लू ढकहाँ, दिनेश पारेख, प्रमोद मोहाडीकर, प्रभाकर खापरे, दिलीप गांधी,राजेंद्र नंदनकर, श्रीकांत ढोलके, रवी पराते, नागेश आसानी, मुन्ना शर्मा, अशोक निखाडे, बाबा ठाकूर, अनिल पौनिपगार ,रवी हिरणवार आदींनी परिश्रम घेतले.