स्वतंत्र विदर्भासाठी उद्या युवकांची कार्यशाळा

By admin | Published: May 7, 2016 02:55 AM2016-05-07T02:55:46+5:302016-05-07T02:55:46+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाने आता विदर्भभर जोर पकडला असून या आंदोलनामध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे, ...

Youth's Workshop for Independent Vidarbha tomorrow | स्वतंत्र विदर्भासाठी उद्या युवकांची कार्यशाळा

स्वतंत्र विदर्भासाठी उद्या युवकांची कार्यशाळा

Next

विदर्भ राज्य आंदोलन समितीचा पुढाकार
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनाने आता विदर्भभर जोर पकडला असून या आंदोलनामध्ये युवकांचा मोठा सहभाग आवश्यक आहे, त्या अनुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघआडीने पुढाकार घेत युवकांसाठी कार्यशाळा (अभ्यास शिबिर) आयोजित केले आहे.
ही विदर्भस्तरीय कार्यशाळा ८ मे रोजी सकाळी ११ ते ५ या वेळात आमदार निवास येथील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेमध्ये स्वतंत्र विदर्भ का?, महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेचे कसे आर्थिक नुकसान हेणार आहे तर विदर्भ राज्यात काय काय फायदे होणार आहे. वेगळे राज्य झाले तर युवकांच्या नोकरीच्या प्रश्न कसा सुटणार? आदी विषयावर विदर्भवादी नेते अ‍ॅड. वामनराव चटप, समितीचे मुख्य संयोजक राम नेवले, समितीचे अर्थतज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. प्रशांत गावंडे आदी विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
विदर्भ राज्य आंदोलनाच्या युवा आघाडीची संघटनात्मक बांधणीही याच शिबिरात होणार असून जिल्हावार युवा आघाडीचे अध्यक्ष व कार्यकारिणी सुद्धा येथे जाहीर करण्यात येईल, असे समितीच्या युवा आघाडी पूर्व विदर्भ अध्यक्ष डॉ. दीपक मुंडे व पश्चिम विदर्भ युवा आघाडी अध्यक्ष प्रदीप धामणकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Youth's Workshop for Independent Vidarbha tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.