'हिंदुस्थानी भाऊ', नेमका आहे तरी कोण? ज्याची होतेय सर्वत्र चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 05:20 PM2022-01-31T17:20:12+5:302022-01-31T18:29:27+5:30
विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून हिंदुस्थानी भाऊचं नाव पुन्हा एकदा वर आलयं. पण नेमका कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ? काय करतो, चला जाणून घेऊया.
नागपूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. याच्या प्रादुर्भावामुळे सर्व कार्यालयीन कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. मग, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून १० वी १२ वीच्या बोर्ड परीक्षा ऑफलाईन का घेतल्या जात आहेत, असा सवाल करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. युट्यूबर हिंदुस्थानी भाऊच्या आवाहनानंतर हे विद्यार्थी ठिकठिकाणी जमले होते, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून हिंदुस्थानी भाऊचं नाव पुन्हा एकदा वर आलयं. पण नेमका कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ? काय करतो, चला जाणून घेऊया.
हिंदुस्थानी भाऊचे मूळ नाव विवेक पाठक असे असून तो मुंबईत राहतो. त्याचे एक युट्यूब चॅनल असून आज त्याच्या फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्याने काही काळ एका मराठी वृत्तपत्रासाठी रिपोर्टर म्हणून काम केले. २०११ साली क्राइम रिपोर्टींगकरता त्याला पुरस्कारही मिळाला आहे.
हा हिंदुस्थानी भाऊ तरुणाईच्या चांगल्याच परिचयाचा आहे. आपल्या युट्यूब चॅनलवर आपत्तीजनक व्हिडिओ आणि मिमिक्री करता तो प्रसिद्ध आहे. त्याच्या युट्यूब चॅनलला मोठ्या संख्येने तरुणाई फॉलो करते. त्याने काही काळापूर्वी कारमध्ये बसून एक व्हिडिओ शूट केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला होता. त्याचे 'रुको जरा सबर करो' वाक्यही प्रचंड गाजले होते. 'पहली फुर्सत' वाले भाऊ म्हणून तो हिट झाला होता. असा हा हिंदुस्थानी भाऊ या ना त्या कारणावरून कायम प्रकाशझोतात राहतो. या हिंदुस्थानी भाऊच्या चॅनलवरील फॉलोवर्सची संख्या ५.४० लाख असून यातून तो वर्षाला लाखो रुपये कमावतो.