युवा सेनेच्या अध्यक्षावर धमकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:09 AM2021-09-03T04:09:12+5:302021-09-03T04:09:12+5:30
नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हितेश यादवसह तिघांविरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अभय भांडारकर ...
नागपूर : हुडकेश्वर पोलिसांनी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हितेश यादवसह तिघांविरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अभय भांडारकर रा. म्हाडा सिटी, गणेश पेठ हे ठेकेदार आहेत. अभयला पंढरीत बांध बांधण्याचे कंत्राट मिळाले. त्यांनी कृष्णराव एलामपुलीकडून ट्रक आणि पोकलेन किरायाने घेतले. त्याचा २८ लाख रुपये किराया झाला. अभयने १५ लाख रुपये दिले. उर्वरित रकमेसाठी अभयचा एलामपुलीसोबत वाद सुरू आहे. १६ ऑगस्टला अभय चंद्रपूरला गेले होते. त्यावेळी यादवने त्यांना फोन केला. एलामपुलीला पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर काही दिवसांनी अभय आपला मित्र योगेश्वर संगीतराव सोबत हितेशला भेटण्यासाठी गेले. हितेशने त्यांना जबरदस्ती आऊटर रिंग रोडवरील ढाब्यावर नेले. तेथे अभयला जीवे मारण्याची धमकी दिली. अभयने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हुडकेश्वर पोलिसांनी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
.........
सिवनीच्या दुचाकी चोराला अटक
नागपूर : ऐशआरामासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या सिवनीच्या युवकाला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. संदीप खेमचंद टेंभरे (२२) रा. वरघाट सिवनी असे आरोपीचे नाव आहे. धंतोली पोलिसांना दुचाकी चोरीच्या प्रकरणात आरोपीचा हात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता सत्यस्थिती बाहेर आली. संदीप खूप दिवसांपासून दुचाकी चोरी करीत आहे. तो ऐशआरामासाठी चोरी करीत होता. दुचाकी मध्य प्रदेशात नेऊन विकत होता किंवा गहाण ठेऊन पैसे उडवत होता. पोलिसांनी त्याच्याकडून ६.४१ लाखांच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई महेश चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केली.
...............