युवासेनेचा दुचाकींना ‘दे धक्का’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:09+5:302021-07-14T04:10:09+5:30
नागपूर : पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवासेनेतर्फे मंगळवारी महालातील टिळक पुतळा चौकात ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी दुचाकींना ...
नागपूर : पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात युवासेनेतर्फे मंगळवारी महालातील टिळक पुतळा चौकात ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी दुचाकींना धक्का देत मोर्चा काढला व नागरिकांचे लक्ष वेधले.
युवासेनेचे मध्य, उत्तर व पूर्व नागपूर विस्तारक धरम मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात महागाईच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड, उपजिल्हा प्रमुख राजे जयसिंग भोसले, उत्तर नागपूर माजी विभाग प्रमुख मनोज शाहू, मध्य नागपूर विभाग प्रमुख संजू कावडे, संजय कसोदन, चंदू कावळे, शंतनु शिर्के, मध्य नागपूर समन्वयक नीलेश निनावे, उपशहर प्रमुख अभिजित दारलिंगे, सोनू गडेकर, हर्षल दरदेमल, संजय डोकरीमारे, जॅकी नांदेश्वर, राहुल निनावे, विकी निनावे, रोहित गौर, शिवम शुक्ला, हिमांशु जैस्वाल, विकी अशोक शाहू, जतिन सावंत आदींनी भाग घेतला.