झिरो माईलच्या स्तंभाला तडे

By admin | Published: March 29, 2016 03:44 AM2016-03-29T03:44:00+5:302016-03-29T03:44:00+5:30

देशाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर. उपराजधानीतील ‘झिरो माईल’चा स्तंभ म्हणजे देशाचे भौगोलिक मध्यवर्ती बिंदू

Zero Mile Stands | झिरो माईलच्या स्तंभाला तडे

झिरो माईलच्या स्तंभाला तडे

Next

नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे नागपूर. उपराजधानीतील ‘झिरो माईल’चा स्तंभ म्हणजे देशाचे भौगोलिक मध्यवर्ती बिंदू होय. येथून देशभरातील शहरांचे अंतर मोजले जाते. त्यामुळे हे ठिकाण नागपूर शहराचेच नव्हे तर देशाचे मानचिन्ह म्हणूनही ओळखले जाते. परंतु देखभाल-दुरुस्तीअभावी झिरो माईलच्या स्तंभाला तडे पडले आहेत. परिणामी देशाचे हे मानचिन्ह संकटात सापडले आहे.
नागपूर हे देशातील मध्यवर्ती शहर आहे. याची जाण ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात एका इंग्रज अधिकाऱ्याने देशातील या मध्यवर्ती ठिकाणचे भौगोलिक मध्यबिंदू शोधून काढले.
देशाचे ते भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे आपले झिरो माईल होय. या ठिकाणी एक सुंदर असा स्तंभ उभारण्यात आला. हा स्तंभ गोवारी शहीद स्मारक व रिझर्व्ह बँक चौक यादरम्यान उभारण्यात आला आहे. हा स्तंभ कधी उभारण्यात आला, याचा कालावधी दर्शविला नाही. परंतु याच्या बाजूलाच एक दुसरा दगडसुद्धा उभारण्यात आला आहे.
पर्यटकांना चिंता
४झिरो माईल हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. ते पाहण्यासाठी दररोज अनेक लोक येतात. सोमवारी विद्याधर सहस्रबुद्धे नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह झिरो माईल पाहायला आली होती. त्यांची नात अमेरिकेला राहते. ते सहकुटुंब नागपूरला आले होते. तेव्हा त्यांनी झिरो माईल पाहायची इच्छा व्यक्त केली, त्यामुळे ते सर्वांना घेऊन आले होते. सहस्रबुद्धे हे सारथी सारख्या संस्थेशी जुळलेले आहे. त्यांना झिरो माईलची अवस्था पाहून अतिशय दु:ख झाले. त्यांना या स्तंभाविषयी विशेष आकर्षण आहे. शून्य मैलाचा दगड म्हणजे नागपूरची ओळख आहे. म्हणून याकडे प्रशासनने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेरिटेज कमिटीलाही जाणीव
४झिरो माईलच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने त्याची दुरवस्था झाल्याबाबत हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटणकर यांना विचारणा केली तेव्हा आपल्याला याची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले. झिरो माईलच्या सौंदर्यीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. परंतु आपण सध्या नागपूर बाहेर असल्याने त्याबाबत सविस्तरपणे सांगून शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Zero Mile Stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.