जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प याच महिन्यात; आचार संहितेपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी

By गणेश हुड | Published: January 4, 2024 06:00 PM2024-01-04T18:00:34+5:302024-01-04T18:00:47+5:30

यासाठी वित्त समितीची बैठक घेण्यात येणार आहे

Zilla Parishad budget in this month; Preparation of budget presentation before code of conduct | जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प याच महिन्यात; आचार संहितेपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प याच महिन्यात; आचार संहितेपूर्वी अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी

गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लाण्यापूर्वी विकास कामांना मंजुरी देता यावी या हेतुने जिल्हा परिषदेचा  २०२४-२५  या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात सादर करण्याची वित्त समितीने चालविली आहे. यासाठी वित्त समितीची बैठक घेण्यात येणार आहे. 

पुढील आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी ४० कोटी ६६ लाख रुपयांचा अर्थसंकल्प वित्त सभापती राजकुमार कुसुंबे यांनी सादर केला होता. तर जिल्हा परिषदेचा वर्ष २०२२-२३ चा ३८ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. पुढील वर्षाचा अर्थसंकल्प ४५ कोटींच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात निधी खर्च करण्यात अनेक अडचणी आल्या. शासनाने निधी खर्चाला लावलेला 'ब्रेक' यामुळे अर्थसंकल्पातील ५० टक्केही निधी खर्च होऊ शकला नाही.  परिणामी पुढील अर्थसंकल्प अधिक रकमेचा राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि शिक्षण विभागांसाठी विशेष तरतूद  करण्याची शक्यता आहे. तर कृषी व पशुसंवर्धन विभागासाठी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक निधी दिला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Zilla Parishad budget in this month; Preparation of budget presentation before code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर