सेवानिवृत्त ४० कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेतर्फे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:17+5:302021-08-01T04:09:17+5:30
नागपूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही बाब अटळ असून सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाविषयक जनजागृती करून लसीकरण मोहिमेस प्रोत्साहन देण्याचे आवाहन ...
नागपूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती ही बाब अटळ असून सेवानिवृत्तीनंतरही कोरोनाविषयक जनजागृती करून लसीकरण मोहिमेस प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हा परिषदेचे ४० कर्मचारी व अधिकारी हे जुलै अखेर सेवानिवृत्त झाले. त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, सभापती तापेश्वर वैद्य, भारती पाटील, उज्ज्वला बोढारे, नेमावली माटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, राजेंद्र भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा जलसंधारण अधिकारी रमेश गुप्ता, कृषी विकास अधिकारी वंदना भेले आदी उपस्थित होते. यावेळी ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. सोहन चवरे यांनी केले.