जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी ये रुलाये...! नियतीने घेतली अशीही अग्निपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2023 08:08 PM2023-04-10T20:08:28+5:302023-04-10T20:08:57+5:30

Nagpur News नियती कधी कुणासोबत कसा खेळ करील याचा नेम नाही, हाच त्यातील सरळसाधा अर्थ. रविवारी शहरातील एका कुटुंबावर नियतीने असाच काहीसा सूड उगवला. तो ज्यालाज्याला कळला, त्याच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

Zindagi... Kaisi Hai Paheli Haye... Kabhi Ye Rulaye...! The ordeal taken by destiny | जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी ये रुलाये...! नियतीने घेतली अशीही अग्निपरीक्षा

जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी ये रुलाये...! नियतीने घेतली अशीही अग्निपरीक्षा

googlenewsNext

नरेश डोंगरे !

नागपूर : सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्या भावस्पर्षी अभिनयाने अजरामर ठरलेला ‘आनंद’ हा चित्रपट पाच दशकांपूर्वी प्रदर्शित झाला. याच चित्रपटात त्यांच्यावर अभिनित झालेले आणि मन्ना डे यांनी गायलेले ‘जिंदगी... कैसी है पहेली हाये... कभी तो हसाये, कभी ये रुलाये...’ हे आशयपूर्ण गीत आजही जगण्याचे वास्तव पटवून देते. ‘आनंद’मधीलच ‘बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नही...’ हा डॉयलॉग अनेकदा अनेक जण अनुभवतात. नियती कधी कुणासोबत कसा खेळ करील याचा नेम नाही, हाच त्यातील सरळसाधा अर्थ. रविवारी शहरातील एका कुटुंबावर नियतीने असाच काहीसा सूड उगवला. तो ज्यालाज्याला कळला, त्याच्या काळजाचे पाणीपाणी झाले.

सोनेगाव परिसरात राहणारे रमन रामटेके प्रॉपर्टी डिलिंग करायचे. ते, पत्नी अन् मुलगा शार्दूल एवढाच त्यांचा परिवार. घरची स्थिती बऱ्यापैकी असल्याने रामटेके दाम्पत्याने शार्दूलला शिक्षणासाठी हैदराबादला पाठविले. सारे काही ठिकठाक सुरू असताना रामटेके दाम्पत्य शनिवारी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे झोपले. मात्र, रविवारी सकाळी रमन रामटेकेंचे डोळे उघडलेच नाहीत. ही वार्ता आधी शेजारी अन् नंतर आप्तस्वकियांना देण्यात आली. एकूलता एक मुलगा शार्दूल तीन वर्षांपासून हैदराबाद येथे हॉटेल मॅनेजमेंट करीत होता. त्याची परीक्षा (पेपर) ११ एप्रिलपासून सुरू होणार होती. त्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांची अशी अकाली एक्झिट झाल्याने सारेच जण हादरले. त्याला सांगावं की नको, या द्विधा मन:स्थितीत नातेवाईक होते. मात्र, वडील गेल्याचे त्याला कळवले नाही तर शार्दूलला त्यांचे अंत्यदर्शनही घेता येणार नाही अन् नंतर त्याला तसेच कुटुंबातील सर्वांनाच आयुष्यभर ती खंत घेऊन जगावे लागेल, याचीही सर्वांना कल्पना आली. त्याला वडिलांच्या निधनाची वार्ता कळविण्यात आली. दोन दिवसांवर आलेल्या परीक्षेच्या तयारीत गुंतलेला शार्दूल कशाबशा भावना सांभाळत नागपुरातील घरी पोहोचला. वडिलांचे कलेवर त्याचीच वाट बघत होते. त्याने अंत्यदर्शन घेतले अन् त्याचे वडील अखेरच्या प्रवासाला निघाले.

काळीज फाडणारी परीक्षा!

रमन रामटेके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असावा, असे सांगितले जाते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे पत्नीची अवस्था शब्दातीत आहे. त्यामुळे तिला अशा अवस्थेत सोडून पुन्हा हैदराबादला जाऊन परीक्षा देण्याचा विचार शार्दूलने धुडकावला आहे. तिला मानसिक आधार देण्याची आणि स्वत:लाही सांभाळण्याची काळीज फाडणारी परीक्षा अवघ्या २३ वर्षीय शार्दूलवर आली आहे.

-----

Web Title: Zindagi... Kaisi Hai Paheli Haye... Kabhi Ye Rulaye...! The ordeal taken by destiny

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू