जि.प. निवडणूक : आजवर काय घडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:10 AM2021-09-14T04:10:59+5:302021-09-14T04:10:59+5:30
- ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे होते. ६ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार होती. ९ जुलै रोजी वैध ...
- ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे होते. ६ जुलै रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होणार होती. ९ जुलै रोजी वैध उमेदवाराची यादी प्रसिद्ध होणार होती. परंतु निवडणूक पुढे ढकलण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने राज्यातील कोरोनाचा धोका, लॉकडाऊनची आवश्यकता या दृष्टिकोनातून निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाने योग्य तो निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते.
- निवडणूक होऊ घातलेल्या सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा धोका व घालण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता निवडणूक आयोगाने पुढची प्रक्रिया थांबविली होती. निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार ६ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल होऊन अवैध उमेदवारी अर्ज काढण्यात आले होते.
असा आहे कार्यक्रम
- आता नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार २१ सप्टेंबर रोजी वैध उमेदवारांची याची प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २७ सप्टेंबर आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी व चिन्हांचे वाटप २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. मतदान ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मतमोजणी ६ ऑक्टोबर रोजी आहे.
--------------
- आम्ही या पोट निवडणुकीत विद्यमान सदस्यांनाच उमेदवारी दिली आहे. आमच्यासाठी राज्यात आणि जि.प. व पं.स. समितीमध्ये सत्ता असल्याने व राज्यात कोरोनाच्या काळात झालेली कामे, जनतेला झालेली मदत ही बाब प्रचारात आमच्यासाठी पॉझिटीव्ह आहे. शिवाय दोन महिन्याचा मिळालेला वेळ ही आमच्यासाठी चांगली संधी होती. आम्ही आमच्या सर्व जागा निवडून आणूच आणि विरोधकांच्याही जागेवर आमचे उमेदवार निवडून येतील.
राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
- उद्या आमची कोअर कमिटीची बैठक आहे. त्यात रणनीती आखण्यात येईल. मिळालेला दोन महिन्यांचा अवधी आमच्यासाठी मारक ठरला. जुलै महिन्यात आमच्यासाठी परिस्थिती चांगली होती. निवडणुका झाल्या असत्या तर निकालही चांगला आला असता. तरीही १६ पैकी १२ जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अरविंद गजभिये, जिल्हाध्यक्ष, भाजप