१० नगरसेवकांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 05:33 AM2017-08-15T05:33:21+5:302017-08-15T05:33:24+5:30
नांदेड महापालिकेतील काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ अशा १० नगरसेवकांनी सोमवारी राजीनामे दिले.
नांदेड : नांदेड महापालिकेतील काँग्रेसचे ४, शिवसेनेचे ४ आणि राष्ट्रवादीचे २ अशा १० नगरसेवकांनी सोमवारी राजीनामे दिले. त्याचबरोबर नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्टÑ’ केला. हे सर्व जण भाजपाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेच्या आॅक्टोबरमध्ये होणाºया निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वेगवान हालचाली घडल्या. दुपारी १च्या सुमारास काँगे्रसचे नगरसेवक सरजितसिंघ गिल, स्नेहलता खांडेकर, किशोर यादव आणि अन्नपूर्णा ठाकूर यांनी भाजपा पदाधिकाºयांच्या उपस्थितीत आपले राजीनामे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे सुपुर्द केले़ नंतर शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते दीपकसिंह रावत यांच्यासह विनय गुर्रम, ज्योती खेडकर, वैशाली देशमुख तसेच राष्ट्रवादीच्या श्रद्धा चव्हाण आणि संदीप चिखलीकर यांनी आपले राजीनामे आयुक्तांकडे दिले़
या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठविला़ जिल्हाप्रमुखपदी काम करताना तीन वर्षांत कोणतेच स्वातंत्र्य मिळाले नाही; तसेच आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता आला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली़