बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:25 AM2019-04-13T00:25:48+5:302019-04-13T00:27:38+5:30

येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.

10 patients found of cancer in Bolegaon! | बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

बिलोली तालुक्यातील बोळेगावात कॅन्सरचे १० रुग्ण!

Next
ठळक मुद्देगावात भीतीचे वातावरण आरोग्य विभागासमोर मोठे आव्हानआरोग्याधिकाऱ्यांचे मात्र कानावर हात

सगरोळी : येथून जवळच असलेल्या बोळेगाव येथे कॅन्सरचे १० रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. गावात भीतीचे वातावरण पसरले. या रोगाचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे.
बोळेगाव हे दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे गाव. येथील गावातील सर्वच नागरिकांना मांजरा नदीचे, बोअरवेलचे पिण्याचे शुद्ध पाणी मिळते. पाणीपुरवठाही सुरळीत होतो. मात्र गत अनेक वर्षांपासून पाणीनमुने तपासण्या करण्याकडे ग्रामपंचायतीसह आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तेलंगणा रॉयल सीमेवरचे गाव असल्याने अनेक नागरिक शिंदी, दारू, विडी, सिगारेट व गुटख्याच्या व्यसनात ओढले गेले आहेत.
या गावापासून तीन कि.मी.अंतरावर सगरोळीचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर १२ कि.मी.वर सर्व सोयी-सुविधांनीयुक्त बिलोली ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालय आहे. गावात दोन अंगणवाड्या असून गरोदर माता, कुपोषित माता व बालके, किशोरवयीन मुलींची तपासणी व आहारविषयी सूचना वेळोवेळी दिल्या जात असल्या तरी यांना कॅन्सर- सारख्या जीवघेण्या रोगाचे रूग्ण आढळले नाहीत. याबाबत या भागात आश्चर्य व्यक्त होत आहे. मांजरा नदीकिनाºयावर वसलेल्या सगरोळी परिसरासह बोळेगावात बºयाच प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे येथील जमीन ओलिताखाली असून या भागात रबी व खरीप हंगामातील पिके व भात (साळ) पिकाबरोबरच भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
फूलकोबी, पानकोबी, गड्डाकोबी, टोमॅटो, वांगी, मिरची, दोडके, भेंडी यासह विविध फळभाज्या तसेच पालेभाज्या, बिलोली, सगरोळी, बोधन, नायगाव, कुंडलवाडी, कासराळी, देगलूर आदी आठवडी बाजारात विकल्या जातात. कमी काळात जादा उत्पादन घेण्याबरोबरच कीड लागू नये म्हणून, या भाज्यावर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारले जातात. त्याचा फटका मात्र नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. त्यासाठी या भागातील माती व पाण्यात नेमके कोणते विषारी घटक आहेत. त्याचे प्रमाण किती आहे? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? कोणते कीटकनाशके घातक आहेत हे तपासणे गरजेचे आहे. यावर काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. बोळेगावातील कॅन्सरचे रुग्ण सध्या बार्शी तर काही मुंबई येथील कॅन्सरसाठी प्रसिद्ध टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
अलीकडेच मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले.असं काही होईल असे वाटलेच नव्हते. सतत जाणवणाºया त्रासामुळे काही चाचण्या बार्शी येथील दवाखान्यात करवून घेतल्या आणि त्यातून कॅन्सरचे दुखणे समोर आले. माझी पत्नी, माझ्या मुलींनी धीर दिला. माझ्या कुटुंबियाच्या प्रेमावर मी कॅन्सरशी लढा देणार आहे - राम शिरगिरे बोळेगाव (बार्शी रूग्णालयात उपचार चालू असलेले रूग्ण.)
लवकरात लवकर उपचार सुरू करणे हा एकमेव उपाय आहे आणि आम्ही तेच केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी सध्या मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आम्ही आशावादी आहोत. कॅन्सरविरूद्ध लढा देण्याचा निर्धार केला. या काळात माझे पती मोलमजुरी करून माझ्या आजारावरील उपचाराचा खर्च करीत आहेत -राधाबाई शिवाजी कोंडापल्ले बोळेगाव (टाटा मेमोरियल मुंबई येथे उपचार घेत असलेले रूग्ण.)
चार ते पाच महिन्यांपूर्वी सगरोळी येथे एक कॅम्प झाला होता. त्या कॅम्पमध्ये कॅन्सरचे रूग्ण आढळून आले नाहीत. कदाचित कॅन्सर रूग्ण दुसºया ठिकाणी उपचार करीत असतील त्यामुळे असे कॅम्पमध्ये दाखल झाले नाहीत. त्यामुळे या भागात कॅन्सर रूग्ण आहेत किंवा नाहीत हे निश्चित सांगणे कठीण आहे -डॉ. वाडेकर, आरोग्य अधिकारी बिलोली

Web Title: 10 patients found of cancer in Bolegaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.