श्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:53 AM2018-06-29T00:53:19+5:302018-06-29T00:53:57+5:30

माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे.

100 crores fund sanctioned for Shrikhetra Mahurgad | श्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

श्रीक्षेत्र माहूरगडासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य शासनाकडून निधी : रोप वे, लिफ्ट कार्यान्वित होणार; तालुक्यातील विविध विकासकामांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे.
राज्य शासनाकडून गत वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहूर तीर्थक्षेत्र विकासासाठी २१६ कोटींच्या भरीव निधीची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात घोषणा होऊन वर्ष लोटले असताना कुठलाच निधी मिळाला नव्हता. आता शासनाने १९ जून रोजी रोप वे साठी ३९. १६ कोटी व लिफ्टसाठी १५.६८ कोटी असे एकूण ५५ कोटीची तरतूद केली आहे़ त्यामुळे माहूर विकासाकडे आता राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केल्याचे सिद्ध झाले आहे.
माहूर येथील श्री रेणुका मातेवर अपार श्रद्धा असणारे केंद्रीय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एच्या वारंगाफाटा ते महागाव रस्त्याचे चौपदरीकरण, भोकर ते धनोडा जंक्शन रस्त्याची पुनर्बांधणी व दर्जोन्नती माहूर ते सारखणी बायपास, माहूर-रेणुकादेवी दत्त शिखर दत्तमांजरी ते पानोळा अशा एकूण २४०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन व कोनशीला समारंभासाठी २३ आॅक्टोबर २०१७ रोजी माहूर दौºयावर आले होते़ तेव्हा माहूर गडावर जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आणि मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली रोप वे आणि लिफ्ट ची मागणी लवकर पूर्ण होईल, अशी ग्वाही दिली होती.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळोवेळी या विभागाचे खा. राजीव सातव, आ. प्रदीप नाईक, काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष नामदेवरावजी केशवे, नगराध्यक्ष अध्यक्ष फिरोज दोसानी, भाजपा नेते धरमसिंग राठोड, अशोक पाटील सूर्यवंशी, श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंदू भोपी, रवींद्र कान्नव, भवानीदास भोपी, समीर भोपी, आशिष जोशी, विनायक फांडदे यांनी पाठपुरावा केला होता.
अखेर त्या पाठपुरवठ्याला यश आले़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जून रोजी महामार्ग रस्ते वाहतूक मंत्रालय मार्फत २०१८-२०१९ च्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून ५५ कोटी मंजूर केल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथील जनता व भाविकात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या शिवाय पडसाजवळ पैनगंगा नदीवर पूल व्हावा यासाठी नामदेवराव केशवे यांनी पाठपुरावा केल्याने ४५ कोटींच्या पुलाच्या कामासही मंजुरी दिली़ एकूण १०० कोटींची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, श्रीक्षेत्र माहूर येथील विकासाची गती आता नव्याने सुरू होणार आहे़ लवकरच ही कामे सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली़
---
शासनाने १९ जून रोजी शासनाने रोप वे साठी ३९.१६ कोटी व लिफ्टसाठी १५.६८ कोटीची रुपयाचा असा एकूण ५५ कोटीची तरतूद करण्यात आल्याने माहूर विकासाकडे आता राज्य शासनाने लक्ष केंद्रीत केल्याचे सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ जून रोजी महामार्ग रस्ते वाहतूक मंत्रालय मार्फत २०१८-२०१९ च्या केंद्रीय रस्ते विकास निधीतून ५५ कोटी मंजूर केल्याने तीर्थक्षेत्र माहूर येथील जनता व भाविकात आनंदाचे वातावरण पसरले आहे. पडसाजवळ पैनगंगा नदीवर पूल व्हावा यासाठी नामदेवराव केशवे यांनी पाठपुरावा केल्याने ४५ कोटींच्या पुलाच्या कामासही मंजुरी दिली़ एकूण १०० कोटींची कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: 100 crores fund sanctioned for Shrikhetra Mahurgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.