४०८ जागांसाठी १०२२ नामांकन २६३ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:31+5:302021-01-08T04:54:31+5:30

हिमायतनगर तालुक्यात ५० ग्रामपंचायतींपैकी वारंगटाकळी, बोरगाव, खैरगाव बिनविरोध यातील खैरगाव ता. येथील एसटी, एससी अशा दोन जागेसाठी नामांकन ...

1022 nominations for 408 seats, 263 withdraw | ४०८ जागांसाठी १०२२ नामांकन २६३ जणांची माघार

४०८ जागांसाठी १०२२ नामांकन २६३ जणांची माघार

Next

हिमायतनगर तालुक्यात ५० ग्रामपंचायतींपैकी वारंगटाकळी, बोरगाव, खैरगाव बिनविरोध यातील खैरगाव ता. येथील एसटी, एससी अशा दोन जागेसाठी नामांकन अर्जच आले नाहीत.

हिमायतनगर तालुक्यात एकूण ५० ग्रामपंचायतींमधील दुधड-वाळकेवाडी ११ जागांसाठी २८ अर्जांपैकी ६ उमेदवारांनी नामांकन माघारी घेतले. २२ उमेदवार रिंगणात, वाघी ७ जागांसाठी २६ नामांकनपैकी १२ उमेदवारांनी माघार घेतली. १४ रिंगणात, एकंबा ७ जागांसाठी २२ नामांकनांपैकी ३ उमेदवार माघारी १७ रिंगणात, कांडली ९ जागांसाठी २४ नामांकनांपैकी ८ उमेदवार माघारी ४ उमेदवार बिनविरोध ८ उमेदवार माघारी १२ उमेदवार रिंगणात, पोटा खु. ७ जागांसाठी १६ नामांकनांपैकी १ उमेदवार माघारी १५ उमेदवार रिंगणात, सिबदरा ७ जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात, जिरोना ७ जागांसाठी १५ नामांकनांपैकी २ उमेदवार माघारी १ उमेदवार बिनविरोध १२ रिंगणात, पवना ९ जागांसाठी २५ नामांकनांपैकी ११ उमेदवार माघारी ३ उमेदवार बिनविरोध १० रिंगणात, एकघरी माजी जि. प. सदस्य ढोले यांचे गाव ७ जागांसाठी ११ नामांकनांपैकी ३ उमेदवार माघारी ६ उमेदवार बिनविरोध तिसरा वाॅर्डामधून २ उमेदवार एका जागेवर निवडणूक, डोल्हारी ९ जागांसाठी २४ नामांकनांपैकी ५ उमेदवार माघारी १९ उमेदवार रिंगणात, पळसपूर ९ जागांसाठी १६ नामांकनांपैकी ६ उमेदवार बिनविरोध ९ उमेदवार रिंगणात, सोनारी ९ जागांसाठी २० नामांकनांपैकी २ उमेदवार माघारी १८ उमेदवार रिंगणात, दाबदरी ७ जागांसाठी २० नामांकनांपैकी ८ उमेदवार माघारी एक अवैध ४ उमेदवार बिनविरोध ७ उमेदवार रिंगणात, धानोरा ९ जागांसाठी २५ नामांकनांपैकी ७ उमेदवार माघारी १८ उमेदवार रिंगणात, टेंभुर्णी ७ जागांसाठी १५ नामांकनांपैकी ५ उमेदवार माघारी १ बिनविरोध ९ उमेदवार रिंगणात, पोटा बु. ११ जागांसाठी ३१ नामांकन पैकी ३ उमेदवार बिनविरोध २२ उमेदवार रिंगणात, पारवा ७ जागांसाठी १४ नामांकनांपैकी २ बिनविरोध १२ उमेदवार रिंगणात, मंगरूळ १४ नामांकनांपैकी २ बिनविरोध १२ उमेदवार रिंगणात, दिघी ३३ नामांकनांपैकी १५ उमेदवार माघारी १८ उमेदवार रिंगणात, पारवा बु. ७ जागांसाठी ३ उमेदवार बिनविरोध २ उमेदवार माघारी ९ उमेदवार रिंगणात, चिंचोर्डी ७ जागांसाठी १८ नामांकनांपैकी २ उमेदवार माघारी १६ उमेदवार रिंगणात, टाकराळा २१ नामांकनांपैकी ४ उमेदवार बिनविरोध ६ उमेदवार माघारी ११ उमेदवार रिंगणात, घारापूर ७ जागांसाठी १० नामांकनपैकी ४ उमेदवार बिनविरोध ६ उमेदवार रिंगणात, सरसम येथे ११ जागांसाठी १९ उमेदवार रिंगणात एक बिनविरोध, जवळगाव ९ जागांपैकी ५ बिनविरोध ४ जागेसाठी १० उमेदवार रिंगणात हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी, पवना, सोनारी, धानोरा, सरसम आदी ठिकाणी अटीतटीची लढत होणार आहे.

Web Title: 1022 nominations for 408 seats, 263 withdraw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.