नांदेडमध्ये नऊ जागांसाठी भाजपकडून १०९ जणांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:03 PM2019-09-06T15:03:52+5:302019-09-06T15:06:17+5:30

विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी केली भाऊगर्दी

109 Interviews by BJP for nine vidhan sabha seats in Nanded | नांदेडमध्ये नऊ जागांसाठी भाजपकडून १०९ जणांनी दिल्या मुलाखती

नांदेडमध्ये नऊ जागांसाठी भाजपकडून १०९ जणांनी दिल्या मुलाखती

Next
ठळक मुद्देसूर्यकांता पाटील, श्यामसुंदर शिंदे यांचाही समावेशसर्वाधिक प्रत्येकी २१ इच्छुक  नांदेड उत्तर आणि  किनवट मतदारसंघासाठी

नांदेड : जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहावर इच्छुकांच्या मुलाखती पार  पडल्या. राज्यमंत्री रणजित पाटील यांनी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. दरम्यान, भाजपाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी पदाधिकाऱ्यांत मोठी रस्सीखेच असल्याचे दिसून आले. ९ जागांसाठी तब्बल १०९ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात सर्वाधिक  प्रत्येकी २१ इच्छुक  नांदेड उत्तर आणि  किनवट मतदारसंघासाठी होते.

शिवसेना-भाजपाची युती होणार की  पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार, याचे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नसले तरी गुरुवारी राज्यमंत्री रणजित पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभेच्या जागांसाठी इच्छुकांशी संवाद साधला. नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांचे नाव आघाडीवर असले तरी याच मतदारसंघातून इतर ७ जण इच्छुक असल्याचे पुढे आले. यात डॉ. संतुक हंबर्डे, महेश खोमणे, दीपकसिंह रावत, चैतन्यबापू देशमुख, बालाजी पाटील पुनेगावकर, बिशन यादव यांचा समावेश होता. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २१ जण लढण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले. 

यात डॉ. धनाजीराव देशमुख, दिलीप कंदकुर्ते, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, चैतन्यबापू देशमुख, मोहनसिंह तौर, मिलिंद देशमुख, बालाजीराव शिंदे, बंडू पावडे, प्रतापराव पावडे, भगवानराव आलेगावकर, अ‍ॅड. दिलीप ठाकूर, अरुणधंती पुरंदरे, डॉ. शीतल भालके, दीपक पावडे, तुळजाराम यादव, बाळासाहेब बोकारे, बालाजी शेळगावकर, विनायक मगर, अजयसिंह बिसेन, व्यंकट मोकले, अ‍ॅड. प्रमोद नरवाडे यांचा समावेश होता. हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघासाठी सूर्यकांता पाटील यांच्यासह ११ जणांनी मुलाखती दिल्या. यात तुकाराम चव्हाण, चंद्रशेखर कदम, माधव देवसरकर, व्यंकटेश लोणे, अरुण सुकळकर, किशोर शिंदे, उमाकांत भोवरे, तात्याराव वाकोडे, गजानन तुप्तेवार, भारती पाटील यांचा समावेश होता. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघासाठी ९ जणांनी मुलाखती दिल्या. यात प्रवीण पाटील चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे यांच्यासह नितीन लाठकर, केरबा बिडवई, दीपक मोरताळे, गजानन मोरे, देवीदास लोहकरे, आशा श्यामसुंदर शिंदे आणि विक्रांत शिंदे यांचा समावेश होता. 

किनवट विधानसभा मतदारसंघासाठीही इच्छुकांची भाऊगर्दी दिसून आली. येथून दिगांबर पवार, आकाश जाधव, अशोक नेम्मानीवार, यादव लिंबाजी जाधव, अशोक पाटील सूर्यवंशी, दिनकर चाडावार, धरमसिंग राठोड, संध्या राठोड, प्रफुल्ल राठोड, शरदचंद्र राठोड, भगवान हुरदुके, श्याम केंद्रे, देवकुमार पाटील, रमन जायभाये, नारायण राठोड, घणेश्वर भारती, निळकंठ कातले, सुधाकर भोयर, सुमित राठोड, बिबीशन पाळवदे आणि संजय जाधव या २१ जणांचा समावेश होता.

नायगाव मतदारसंघासाठी १३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात लक्ष्मणराव ठक्करवाड, दत्ताहरी हिवराळे, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, राजेश पवार, माधवराव धर्माधिकारी, हावगीराव वनशेट्टे, माणिकराव लोहगावे, मिनलताई खतगावकर, रवींद्र पोतगंटीवार, शिवराज होटाळकर, धनराज शिरोळे आणि गजानन चव्हाण यांचा समावेश होता. 

भोकर विधानसभा मतदारसंघाठी ९ जणांनी मुलाखती दिल्या. यात राम चौधरी, डॉ. माधवराव किन्हाळकर, नागनाथ घिसेवाड, निलेश देशमुख, प्रवीण गायकवाड, किशोर पाटील, गणेश पाटील कापसे, गणेशराव तुकाराम पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांचा समावेश होता.  तर देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भीमराव क्षीरसागर, धोंडिबा कांबळे, जया राजकुंडल, बाळू राजकुंडल, विठ्ठल राजकुंडल, मधु गिरगावकर, मारोती वाढेकर, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, अभिषेक सैबदे, माधव वाघमारे, अशोक साखरे आणि लक्ष्मीबाई हाटकर या १२ जणांचा समावेश होता. मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी ७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यात आ. तुषार राठोड आणि रामदास पाटील यांच्यासह  व्यंकटराव गोजेगावकर, त्र्यंबक सोनटक्के, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, शिवकुमार देशमुख, पंजाबराव वडजे, नामदेव जाहूरकर आणि माधव साठे यांचा समावेश होता. 

Web Title: 109 Interviews by BJP for nine vidhan sabha seats in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.