जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी ११ केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:19 AM2021-05-06T04:19:04+5:302021-05-06T04:19:04+5:30
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ८६० लाभार्थ्यांनी शहरी ...
१ मे पासून १८ ते ४४ वयोगटाच्या व्यक्तींसाठी लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ८६० लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे ९०१, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे ८५५, प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा ९४७, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर ८७७ येथे असे एकूण ४ हजार ४४० लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. ६ मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरू गोविंदसिंगजी मेडिकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, स्त्री रुग्णालय, श्यामनगर या केंद्राचा समावेश आहे.
ताप, कोरडा खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करून घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरून स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी एक मीटर (३ फूट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, मास्क वापरणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा. जेव्हा आपल्याला खोकला, शिंक येते तेव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.