नांदेडमध्ये ११ मृत्यू; १०० रुग्ण बरे होऊन घरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 10:48 AM2023-10-11T10:48:18+5:302023-10-11T10:48:48+5:30
२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला.
नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील २४ तासांत २४ महिलांची प्रसूती झाली आहे, तर अतिगंभीर असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका बालकासह दहा प्रौढांचा समावेश आहे, तर ४८ रुग्णांवर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे.
२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला.
तसेच युद्धपातळीवर रुग्णालयाला औषधी पाठविण्याची तयारी करण्यात येत आहे. गेल्या २४ तासांत रुग्णालयातून १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १ हजार १६५ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, सध्या रुग्णालयात ७२६ रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयात ४८ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्यात ३५ मोठ्या, तर १३ लहान शस्त्रक्रियांचा समावेश आहे. २४ प्रसूतीमध्ये ७ सिझर, तर १७ प्रसूती नॉर्मल झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आवाहनानंतर काँग्रेसने पाच लाखांची औषधी, ५० परिचारिकांची सेवा देण्याचा निर्णय घेतला.