नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 06:47 AM2021-11-16T06:47:04+5:302021-11-16T06:47:54+5:30

ट्रकमधून विशाखापट्टणम् येथून जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणार असल्याची टीप ‘एनसीबी’च्या मुंबई पथकास मिळाली. पथकाने या वाहनावर पाळत ठेवली होती.

1127 kg cannabis seized in Nanded | नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये

नांदेडमध्ये ११२७ किलो गांजा जप्त, किंमत एवढे कोटी रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देजप्त केलेल्या ११२७ किलो गांजाची किंमत अंदाजे  अकरा कोटींच्या आसपास असल्याचे पथक प्रमुख सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडगा  (नांदेड) : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (एनसीबी) मुंबई येथील पथकाने सोमवारी पहाटे नांदेड जिल्ह्यातील मांजरम येथे वाहन तपासणीत एक हजार १२७ किलो गांजा जप्त केला. ट्रकचालक आणि क्लीनरला एनसीबीतर्फे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, पथक मुख्य आरोपीचा शोध घेत आहे. या कारवाईमुळे आंध्र प्रदेशातून नांदेडमार्गे खान्देशात होणारी गांजा व अमली पदार्थांची तस्करी उघड झाली आहे.  

ट्रकमधून विशाखापट्टणम् येथून जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक करणार असल्याची टीप ‘एनसीबी’च्या मुंबई पथकास मिळाली. पथकाने या वाहनावर पाळत ठेवली होती. सोमवारी पहाटे देगलूरमार्गे नांदेडकडे जात असताना मांजरम गावाजवळ पथकाने हा ट्रक अडविला. त्यावेळी गांजाच्या २ व ५ किलोच्या ४३ गोण्या आढळून आल्या. विशेष म्हणजे गांजाची वाहतूक करणारा ट्रक हा जळगावचा असला तरी त्याचे पासिंग मात्र नांदेडचे आहे.
जप्त केलेल्या ११२७ किलो गांजाची किंमत अंदाजे  अकरा कोटींच्या आसपास असल्याचे पथक प्रमुख सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Web Title: 1127 kg cannabis seized in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.