एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 08:17 AM2023-03-31T08:17:21+5:302023-03-31T08:18:22+5:30

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते.

12 people were sitting in rikshaw, five were killed in a collision with a truck in nanded | एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

googlenewsNext

मुदखेड (जि. नांदेड) : ट्रक आणि ऑटोरिक्षाची जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण ठार, तर सात जण जखमी झाले आहेत. नांदेड-मुदखेड रस्त्यावर मुगटजवळील पेट्रोल पंपासमोर गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिलांसह एका सात महिन्यांच्या बालकाचा समावेश आहे. जखमींवर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते. मुगट परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षा पलटी झाला. ऑटोरिक्षातील काही जण ट्रकच्या चाकाखाली तर काही ऑटोमध्येच जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाले. गालीअम्मा कल्याण भोई (२४), वेजल कल्याण भोई (७ महिने), पुंडलिक बळीराम कोल्हाटकर (७०), ज्योती रमेश भोई (३२) या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर विद्या संदेश हटकर (३७) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

Web Title: 12 people were sitting in rikshaw, five were killed in a collision with a truck in nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.