जिल्ह्यातील १२५ महाविद्यालये सुरू, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, कोरोनाबाबत काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:18+5:302021-02-16T04:19:18+5:30
यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालये सुरू करताना नियमावली तयारी केली आहे. महाविद्यालयातील वर्गखोल्यांची क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थीसंख्येच्या ५० ...
यासाठी विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालये सुरू करताना नियमावली तयारी केली आहे. महाविद्यालयातील वर्गखोल्यांची क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना एकूण विद्यार्थीसंख्येच्या ५० टक्के प्रमाणात रोटेशन पद्धतीने वर्गात अध्यापनासाठी प्रवेश देण्यात आला. त्यानुसार संबंधित वर्गाच्या प्रवेशित विद्यार्थीसंख्येनुसार नियोजन करण्यात आले. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने वर्ग घेण्यात येत आहेत. वर्गखोल्यांत वेळोवेळी सॅनिटायझर करण्यात आले. तसेच काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना दर्शनी भागावरील फलकावर लावल्या होत्या.
चौकट- मास्क व सॅनिटायझर
नांदेड शहरातील महाविद्यालयात कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करताना दिसून आले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर केला. प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनीने मास्क लावला होता. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येकाने खबरदारी घेऊन महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रवेश केला. तसेच सुरक्षित अंतर ठेवूनच वर्गखोल्यांत आसनव्यवस्था करण्यात आली होती.
चौकट- प्राचार्यांचा कोट
आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यास मिळाला. जवळपास ६० टक्के उपस्थिती होती. सकाळाच्या सत्रात रोटेशन पद्धतीने वर्ग भरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून त्यांना वर्गात बसविण्यात आले. तसेच प्रत्येकालाच मास्क होते. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अध्यापन सुरू आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी महाविद्यालयाने इंटरनेटची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. - प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, यशवंत महाविद्यालय, नांदेड
चौकट- कोरोनामुळे सबंध वर्षभर महाविद्यालयात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे कधी एकदाचे कॉलेजला जावे असे झाले होते. सर्व नियमांचे पालन करीत आम्ही आज पहिल्या दिवशी महाविद्यालयात गेलो.- निकिता सूर्यवंशी, एमजीएम महाविद्यालय, नांदेड
चौकट- ऑनलाइन वर्ग सुरू होते. मात्र, प्रत्यक्ष वर्गात येऊन शिकण्याचा आनंद वेगळा असतो. त्यामुळे प्रत्यक्ष अध्यापन कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा आम्हाला होती. आज ती संपली. पहिला दिवस आनंदाचा गेला. - शीतल महाजन, एमजीएम महाविद्यालय, नांदेड
चौकट- मागील वर्ष अनेक अर्थाने सर्वांसाठी खूप काही शिकण्यासारखे होते. एरव्ही कॉलेजला कधी गेलो नाही, तर त्याचे काहीच वाटत नव्हते. मात्र, आता कधी कॉलेजला जायला मिळेल, याची वाट पाहण्याची वेळ आली. त्यामुळे कॉलेजला येऊन समाधान वाटले. - एमजीएम महाविद्यालय, नांदेड