जिल्ह्यात १२६ मोस्ट वॉन्टेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:13 AM2021-01-10T04:13:54+5:302021-01-10T04:13:54+5:30
नांदेड : जिल्ह्यात चोरी, दरोडा यांसह खुनाच्या घटनांतील तब्बल १२६ आरोपी पोलिसांच्या दप्तरी वॉन्टेड आहेत. वर्षानुवर्षांपासून या आरोपींचा शोध ...
नांदेड : जिल्ह्यात चोरी, दरोडा यांसह खुनाच्या घटनांतील तब्बल १२६ आरोपी पोलिसांच्या दप्तरी वॉन्टेड आहेत. वर्षानुवर्षांपासून या आरोपींचा शोध सुरू आहे. त्यात काहीजणांच्या मुसक्या आवळण्यातही पोलिसांना यश आले आहे; परंतु दरवर्षी वॉन्टेड गुन्हेगारांचा हा आकडा वाढतच जातो.
गेल्या वर्षभरात नांदेडात खंडणीसाठी गोळीबार किंवा अपवाद वगळता हायप्रोफाईल गुन्हेगारीच्या घटना घडल्या नाहीत; परंतु चोरी, दरोडा यांसह इतर खुनाच्या घटनांतील जवळपास १२६ आरोपी हे वॉन्टेड आहेत. यामध्ये काही कुख्यात आरोपींचा सहभाग आहे; तर ११५४ आरोपी हे पोलिसांच्या दप्तरी पाहिजे असलेल्या सदरात मोडतात. पोलिसांकडून या गुन्हेगारांचे नातेवाईक, मित्र यांच्यावर नेहमी पहारा ठेवला जातो. गुन्हा केल्यानंतर काही दिवस ते पळून इतर राज्यांत जातात; परंतु गावाच्या ओढीने ते परत आल्यानंतर खबऱ्यांकडून माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा त्यांच्या मुसक्या आवळते. वर्षानुवर्षांपासून फरार अशा अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.