१३ प्रकरणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:24 AM2021-02-26T04:24:33+5:302021-02-26T04:24:33+5:30
धनादेश वाटप बिलोली - संजय गांधी निराधार योजनेतील कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुख ...
धनादेश वाटप
बिलोली - संजय गांधी निराधार योजनेतील कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत बिलोली तालुक्यातील बोळेगाव येथील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील प्रमुख व्यक्ती मरण पावल्याने त्यांच्या कुटुंबीयांना २० हजार रुपये धनादेशाद्वारे तहसीलदार कैलास वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी बाबूराव मुळेकर, तलाठी राजकुंडल, अव्वल कारकून झंपलवार, सुरेश गोणेकर, गंगाधर कुडके, गंगाधर सित्रे आदी उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
मारतळा - धनज ता.लोहा येथे खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी उद्घाटन केले. शिवजन्मोत्सव व महाशिवरात्रीनिमित्त गणेश पाटील सावळे मित्रमंडळाच्या वतीने स्पर्धा घेण्यात येत आहेत. अध्यक्षस्थानी सभापती बालाजी पाटील मारतळेकर होते.
नळ योजनेचा शुभारंभ
बिलोली - तालुक्यातील नागणी येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी नळ योजना सुरू केली. योजनेचा शुभारंभ संतोष पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच लक्ष्मीबाई आगळे, उपसरपंच गंगाधर शिंदे, ग्रामसेवक एन.जी.वारले आदींसह सदस्य दिव्यरत्न कांबळे, हाणमाबाई कोकरे, मोहन निदाने, माधव इबितवार आदी उपस्थित होते.
अवैध वृक्षतोड
उमरी - तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याची तक्रार आहे. तालुक्यातील करकळा, निमटेक, बोथी, तुराटी, सावरगाव, रामखडक, शिरूर, कळगाव आदी गावांत अवैध वृक्षतोड सुरू असल्याची तक्रार आहे. वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.