जिल्ह्यात १३ लाख २१ हजार मतदार बजावणार हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:16+5:302021-01-13T04:43:16+5:30

या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २ हजार ९१३ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले. जिल्ह्यात ...

13 lakh 21 thousand voters will exercise their right in the district | जिल्ह्यात १३ लाख २१ हजार मतदार बजावणार हक्क

जिल्ह्यात १३ लाख २१ हजार मतदार बजावणार हक्क

Next

या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात २ हजार ९१३ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ५४ हजार ५११ मतदार हे मुखेड तालुक्यात आहेत तर त्याखालोखाल १ लाख ४१ हजार ६६८ मतदार हदगाव तालुक्यातील आहेत. देगलूर तालुक्यात १ लाख १२ हजार ९४ हजार, कंधार तालुक्यात १ लाख ३८ हजार १८२, नांदेड तालुक्यात १ लाख ८ हजार ९१, अर्धापूर ६४ हजार ९६१, भोकर ५६ हजार ५१४,मुदखेड ५९ हजार ३१९, किनवट २८ हजार ३६३, हिमायतनगर ५४ हजार ७०६, नायगाव ९९ हजार १७६, बिलोली ८६ हजार ५४५, उमरी ५१ हजार ११८, धर्माबाद तालुक्यात ३८ हजार ३४ आणि माहूर तालुक्यात १२ हजार ७३७ एकूण मतदार आहेत.

एकूण मतदारांमध्ये ६ लाख ८९ हजार ११९ पुरूष तर ६ लाख ३२ हजार ९० महिला मतदार आहेत. पुरुष मतदारांमध्ये सर्वाधिक ८० हजार ९८७ मतदार मुखेड तालुक्यात तर महिलांमध्ये सर्वाधिक मतदार या मुखेड तालुक्यातच असून ७३ हजार ५२३ मतदारांचा समावेश आहे.

Web Title: 13 lakh 21 thousand voters will exercise their right in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.