जिल्ह्यात नवे १३८ कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:13 AM2021-06-10T04:13:42+5:302021-06-10T04:13:42+5:30
रुग्णसंख्या आता ९० हजार ६९९ वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८९४ इतका झाला आहे. बुधवारी १४६ ...
रुग्णसंख्या आता ९० हजार ६९९ वर पोहोचली आहे, तर बळींचा आकडा १ हजार ८९४ इतका झाला आहे.
बुधवारी १४६ जणांनी कोरोनावर मातही केली आहे.
जिल्ह्यात बुधवारी ३ हजार ६११ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३ हजार ४३० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले, तर
१३८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्रात २७, नांदेड ग्रामीण १६,
अर्धापूर १, हदगाव २, कंधार १, किनवट ३, लोहा ३, मुखेड ४, नायगाव १, माहूर १, मुदखेड १, उमरी १,
परभणी २, यवतमाळ १ व हिंगोली जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळला. अँटिजन तपासणीत मनपा क्षेत्रात
३६, नांदेड ग्रामीण १४, अर्धापूर १, देगलूर ३, हदगाव ३, हिमायतनगर १, कंधार १, लोहा ३, मुखेड २, उमरी
२, परभणी २, हिंगोली २, यवतमाळ २ आणि वाशिम जिल्ह्यातील १ जण पॉझिटिव्ह आढळला. पोर्णिमानगर
येथील एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बुधवारी १४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २, मुखेड १, देगलूर २, किनवट १, अर्धापूर १, माहूर ४, बिलोली १, भोकर २, हिमायतनगर ५, मनपाअंतर्गत गृहविलगीकरणातील १०७ व खासगी रुग्णालयातील
१८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ८७ हजार ६३६ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या ३३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील १४ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.