नांदेड जिल्ह्यात १४४.९२ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:00 AM2020-07-06T11:00:36+5:302020-07-06T11:01:19+5:30
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी सर्वदूर असा पाऊस अद्याप आवश्यक आहे.
Next
नांदेड - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 144.92 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 39.67 पाऊस हिमायतनगर तालुक्यात झाला.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी सर्वदूर असा पाऊस अद्याप आवश्यक आहे. खरीपाची पेरणी उरकल्यानंतर पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असा पाऊस होत आहे. सोमवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार किनवट तालुक्यात 25 मिमी पाऊस झाला. तर माहुर तालुक्यात 10.50, हदगाव तालुक्यात 15.86, बिलोली 10.20, धर्माबाद 13 मिमी आणि भोकर तालुक्यात 7.25 मिमी पाऊस झाला.
जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 23.72 टक्के पावसाची नोंद जुलैच्या सुरुवातीला झाली आहे.