हदगाव तालुक्यात १५ गावांच्या विहिरी आटल्या; बरडशेवाळा कालवा फुटल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 06:25 PM2018-01-24T18:25:46+5:302018-01-24T18:28:00+5:30

बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे.

15 villages have wells in Hadagaon taluka; Bardsevala canal firing results | हदगाव तालुक्यात १५ गावांच्या विहिरी आटल्या; बरडशेवाळा कालवा फुटल्याचा परिणाम

हदगाव तालुक्यात १५ गावांच्या विहिरी आटल्या; बरडशेवाळा कालवा फुटल्याचा परिणाम

googlenewsNext
ठळक मुद्देहदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या सुरु

हदगाव : बरडशेवाळा कालवा फुटल्यामुळे कालवा परिसरातील १५-२० गावांतील पाणीपुरवठ्याच्या विहिरी आटल्याने गावांत पाणीटंचाई समस्या जानेवारीतच सुरू झाली आहे. हदगाव तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९६० मि़मी़ असताना ४६० मि़मी़ पाऊस झाला़ त्यामुळे नेहमीचे टँकरयुक्त गावे सोडून नदीकाठावरील गावांनाही पाणीटंचाईने आपल्या पाशात ओढले आहे़  नदी-नाले यावर्षी भरलेच नाहीत़ पडलेला पाऊस शेताबाहेरही निघाला नाही़ त्यामुळे रबी पिकांनाही फटका बसला़ बोंडअळीने कापूस खाल्ला तर सोयाबीनला करप्या रोगाने उद्ध्वस्त केले़ हरभरा व गहू पिकासाठी वातावरण पोषक असतानाही पाण्यामुळे गहू पिकाचा पेरा कमी झाला.

हरभरा पिकाचा पेरा दरवर्षी पेक्षा यावर्षी वाढला़; पण इसापूर धरणात १३ टक्केच पाणी असल्याने रबी पिकांना तीनऐवजी एकच पाणी पाळी करण्यात आली़ पाणी पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच वाहून गेले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल. कालव्याच्या दुरुस्तीचे काम आता हाती घेण्यात आले, दुरुस्तीही होईल, एक पाणीपाळी पुन्हा मिळेलही, मात्रही पाणीपाळी पिकांसाठी उशिरा ठरणारी आहे. अनेकांचा हरभरा काढणीला आला.

दरम्यान, बरडशेवाळा कालवा परिसरातील गावे पाण्याने व्याकूळ  झाली. कालव्याचे पाणी वाहून गेल्याने परिसरातील बरडशेवाळा, उंचाडा, नेवरी, तालंग, नेवरवाडी,  पळसा, अंबाळा, कोथळा, गोर्लेगाव,  बेलमंडळ, वाटेगाव आदी गावांत आतापासूनच पाणीटंचाई निर्माण झाली. या कालव्याला ७ जानेवारी रोजी पाणी सोडले होते़ ते शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी ८-१० दिवस लागत होते़ त्यामुळे या परिसरातील विहिरींना पाणी राहिले असते; पण ८ जानेवारी रोजी कालवा फुटला़ काम करण्यासाठी पाणी बंद केले़ आज १२ दिवस उलटले तरी काम पूर्ण झाले नाही़ त्यामुळे विहिरींनी तळ गाठला़ नदीकाठी असलेले खाजगी बोअरही मुकळ्या टाकीत आहेत़ मनाठा, कनकेवाडी, सावरगाव, वडगाव, चिंचगव्हाण, शिवपुरी या गावाना दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा होतो.  या गावांना पाणी देण्यासाठी ज्या विहिरी, बोअरचे खाजगीकरण करण्यात येते. त्या नदीकाठच्या गावचेच पाणी आटल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट उभे टाकले आहे़  कालव्याचे काम आटोपून पाणी सोडल्यास या गावातील पाणीटंचाई समस्या काही प्रमाणात सुटू शकते़ 

कणकेवाडीत भटकंती
हदगाव तालुक्यातील कणकेवाडी येथील पाणीयोजना कुचकामी ठरल्याने मागील पंधरा दिवसांपासून गावात पाणीटंचाई आहे. शिवप्रसादनगरतांडा व वाडी मिळून कणकेवाडी ग्रामपंचायत २००५ मध्ये अस्तित्वात आली. यापूर्वी गावातील बोअर, हातपंपाला मुबलक पाणी होते. मात्र गेल्या चार- पाच वर्षांपासून जून-जुलैपर्यंतही पाणीटंचाई असते. तांडावस्तीचा निधी खर्चून नळयोजना करण्यात आली, मात्र ती कुचकामी ठरली. पाणीटंचाईच्या बैठकीत उपसरपंच प्रकाश राठोड यांनी आ. आष्टीकर यांच्याकडे टँकरची मागणी केली होती, मात्र अद्याप टँकर सुरु झाले नाही. गावकर्‍यांना आता १ कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागत आहे.

इसापूर धरणात केवळ १३ टक्के पाणी 
हरभरा पिकाचा पेरा दरवर्षीपेक्षा यावर्षी वाढला.इसापूर धरणात पाणी १३ टक्केच असल्याने रबी पिकांना मिळणार्‍या पाणीपाळ्या तीनऐवजी एकच करण्यात आली.परंतु तीही शेतकर्‍याच्या पिकांना मिळण्याऐवजी बरडशेवाळा कालवा फुटल्याने नाल्यामध्येच सात हजार क्युमेक्स पाणी वाहून गेले. यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले.आता काम झाल्यानंतर एक पाणीपाळी मिळेलही़ परंतु पिकासाठी ही पाणीपाळी उशिरा ठरली.

Web Title: 15 villages have wells in Hadagaon taluka; Bardsevala canal firing results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.