नांदेडमध्ये ‘रमाई’ योजनेसाठी १६ कोटींची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:35 AM2018-09-17T00:35:20+5:302018-09-17T00:35:49+5:30

महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे.

16 crore for 'Ramai' scheme in Nanded | नांदेडमध्ये ‘रमाई’ योजनेसाठी १६ कोटींची गरज

नांदेडमध्ये ‘रमाई’ योजनेसाठी १६ कोटींची गरज

Next
ठळक मुद्देघरकुलासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, क्षेत्रीय कार्यालयात अर्ज करता येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजना (शहरी) योजनेसाठी महापालिकेला १५ कोटी ८४ लाखांच्या निधीची गरज असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २६ कोटी रुपये खर्च झाला आहे.
महापालिकेला २०१०-११ पासून २ हजार ६७७ घरकुल बांधणीचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. आतापर्यंत महापालिकेने १०३८ घरकुले पूर्ण केली आहेत तर ३४१ घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. १९१ घरकुलांना मान्यता मिळूनही अद्याप लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही. या योजनेवर महापालिकेने आतापर्यंत २६ कोटी रुपये खर्च केले असून उर्वरित घरकुलांसाठी १५ कोटी ८४ लाख रुपये निधी आवश्यक आहे.
महापालिकेच्या झोन क्र. १ अंतर्गत सर्वाधिक ३३४ घरकुलांचे काम पूर्ण झाले तर १४५ घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. झोन क्र. २ मध्ये ३४२ घरकुले पूर्ण झाले असून ११४ घरकुले प्रगतीपथावर आहेत. झोन क्र. ३ मध्ये ७६ कामे पूर्ण, ७ प्रगतीपथावर, झोन क्र. ४ मध्ये ९० कामे पूर्ण, १८ कामे प्रगतीपथावर, झोन क्र. ५ मध्ये १५५ कामे पूर्ण, ४७ प्रगतीपथावर आणि झोन क्र. ६ मध्ये केवळ ४१ घरकुले पूर्ण झाले असून १० घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहेत.
महापालिकेने २ हजार ६७७ घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी १५७० लाभार्थी अंतिम केले आहेत आणि उर्वरित १ हजार १०७ लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे कार्यकारी अभियंता माधव बाशेट्टी, उपअभियंता प्रकाश कांबळे यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांसाठी घरे बांधून देण्यात येणार आहेत. या योजनेत घरकुलांसाठी अर्ज करण्यासाठी महापालिकेने मुदतवाढ दिली आहे. क्षेत्रीय कार्यालयात लाभार्थ्यांना घरकुलांसाठी अर्ज करता येणार आहेत. हे अर्ज ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत स्वीकारले जाणार आहेत. ज्या नागरिकांनी यापूर्वी अर्ज केला असल्यास त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. घरकुलांसाठीचे अर्ज आॅफलाईन स्वीकारण्याची व्यवस्था क्षेत्रीय कार्यालय १ ते ६ मध्ये करण्यात आली आहे. या योजनेच्या अटी व शर्थीनुसार आवश्यक कागदपत्रांची परिपूर्ण असलेले अर्ज स्वीकारण्यात येतील. यापूर्वी महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेसाठी आॅनलाईन घरकुल मागणी सर्वेक्षण केले होते. मात्र काही गरजू नागरिकांना अर्ज दाखल करण्यासाठी वेळ मिळाला नसल्याने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५१ हजार ७६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ४४ हजार ५२ अर्ज महापालिकेला आॅनलाईन सबमिट झाले आहेत. त्यातील २३ हजार ४८ प्रस्तावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून उर्वरित २१ हजार ४ अर्जांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.
या अर्जामध्ये स्वत: बांधकाम करणाºया लाभार्थ्यांची संख्या १० हजार २४५ इतकी आहे. त्यातील ९ हजार ११७ अर्जांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.
ही योजना स्वत:ची जागा असणाºयांसाठी आहे. त्याचवेळी भाडेकरुसाठी परवडणारी घरे देण्यात येणार आहेत. शहरातील २२ हजार ५७९ भाडेकरुंनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यातील १० हजार ५३८ अर्जांचा सर्व्हे पूर्ण झाला असून हे लाभार्थी पात्र ठरले आहेत. या भाडेकरुंसाठी पहिल्या टप्प्यात हडको येथील पंचशील बुद्धविहाराच्या पाठीमागील जागेत ९०० घरांचे काम सुरू केले जाणार आहे. त्याचवेळी नांदेड महापालिकाही आपल्या स्वत:च्या जागेवर भाडेकरुंसाठी घरकुले उभी करणार आहेत. त्यामुळे स्वत:ची जागा असणाºयांसह भाडेकरुंनाही या योजनेअंतर्गत तत्काळ घरे उपलब्ध होतील, असे चिन्हे आहेत.
घरकुलासाठी १४ मॉडेल उपलब्ध करुन देण्यात आले असून यापैकीच एका मॉडेलप्रमाणे लाभार्थ्यांना बांधकाम करावे लागणार आहे.

दहा आराखड्यांना केंद्र शासनाची मान्यता
पंतप्रधान आवास योजनेचे दहा आराखडे केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. पहिला आणि दुसरा आराखडा ३० जून २०१८ रोजी मंजूर केला असून ५०० घरकुलांना मान्यता दिली. तिसºया, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या टप्प्यांतील आराखड्यांना २५ जुलै २०१८ रोजी मान्यता देत १ हजार घरकुले आणि ७ ते १० व्या टप्प्यातील आराखड्याला २३ आॅगस्ट २०१८ रोजी केंद्र शासनाने मंजुरी दिली असून त्यात १७ हजार ९१ घरकुलांना मान्यता दिली आहे. प्रत्येक घरकुलासाठी शासनाकडून अडीच लाखांचे अनुदान दिले जाणार आहे. येत्या महिनाभरात हे काम सुरू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला चार टप्प्यात अनुदान दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान हे पायाभरणीचे काम पूर्ण झाल्यानंतर थेट खात्यामध्ये जमा केले जाईल.

Web Title: 16 crore for 'Ramai' scheme in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.