दोन बसेसच्या टक्करीत १६ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:21 AM2019-05-04T00:21:37+5:302019-05-04T00:22:58+5:30
पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस्त्यावर माहूरपासून ७ कि़मी़ अंतरावर धानोडा फाट्यावर घडली़
श्रीक्षेत्र माहूर : पुसदवरून माहूरला येणारी एस़टी़ बस धानोडा फाट्यावर प्रवासी उतरवत असताना यवतमाळवरून उमरखेड येथे जाणाऱ्या एस़टी़बसने उभ्या बसला मागच्या बाजूस जोराची धडक दिल्याने दोन्ही बसमधील एकूण १६ प्रवासी जखमी झाल्याची घटना ३ मे रोजी सकाळी ७़४५ वाजता माहूर-नांदेड रस्त्यावर माहूरपासून ७ कि़मी़ अंतरावर धानोडा फाट्यावर घडली़
पुसदवरून माहूरला येणारी बस (क्ऱ एम़एच़०६ एस़ ८३५३) या बसचे चालक माधव मस्के, वाहक निशिकांत बंडरप हे धानोडा फाट्यावर बस थांबवून प्रवासी उतरवत होते़ तेवढ्यात यवतमाळहून उमरखेडकडे जाणारी बस (क्ऱ एम़एच़४०-एक़्यू़ ६१०९) चे चालक प्रवीण मनवर यांना समोरची बस पुढे जात असल्याचा भास झाल्याने त्यांनी ब्रेक न लावल्याने बस समोरच्या बसला जाऊन मागच्या बाजूस धडकली़
या धडकेत वाहक एस़एस़वळसे, प्रवासी दादाराव यलटवार (वय ६०़ रा दहिसावळी ता़आर्णी), मनोहर गुडडप (वय ६०, रा़आमनी ता़महागाव), अनिता मोतेपवार (४०, रा़किनी ता़ भोकर), प्रकाश मोतेपवार (४५), चंद्रकांत कुमरे (६०, रा़ आर्णी), साहिल कव्हाणे (१४, रा़अणशिंग, ता़वाशीम), प्रयागबाई चळतवार (४५, रा़दहिसावळी), गणेश दारमोडे (५०, रा़दहिसावळी), राजाबाई काळे (६०, रा़दारगव्हान), शशिकलाबाई इडतवाड (६०, दहीसावळी), मुरलीधर कांबळे (६६, रा़यवतमाळ), सुनील राठोड (३२, रा़सुकळी) हे जखमी झाले़ स्थानिक नागरिकांसह खासगी प्रवासी वाहतूक करणा-या वाहनधारकांनी बसमधील जखमींना माहूरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले़ येथे डॉ़अश्विन बोमकंटीवार, डॉ़निरंजन केशवे, डॉ़ए़डी़आंबेकर यांनी प्रथमोपचार करून तीन गंभीर जखमींना यवतमाळ येथे पुढील उपचारासाठी पाठविले़ घटना कळताच आगारप्रमुख व्ही़टी़धुतमल, आऱजी़पाटील, एस़सीक़ातरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली़ तसेच प्रत्येक जखमीस ५०० रुपये नगदी स्वरूपात मदत केली़ घटनेची माहिती मिळाल्याने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, पो़ नि़ लक्ष्मण राख यांनी रुग्णालयात जाऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचाराची व घटनेची माहिती घेतली़