नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत १७ अर्ज ठरले अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:20 AM2021-03-09T04:20:41+5:302021-03-09T04:20:41+5:30

उमरी येथून विक्रम श्रीधरराव देशमुख यांचाही अर्ज अवैध ठरला. किनवट येथून नारायण धारबाजी दराडे यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. ...

17 applications declared invalid in Nanded District Central Co-operative Bank elections | नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत १७ अर्ज ठरले अवैध

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत १७ अर्ज ठरले अवैध

googlenewsNext

उमरी येथून विक्रम श्रीधरराव देशमुख यांचाही अर्ज अवैध ठरला. किनवट येथून नारायण धारबाजी दराडे यांचे दोन्ही अर्ज अवैध ठरले. माहूरमध्ये लालुजी दत्तराव मोहिते व बंडू श्यामराव भुसारे यांचे अर्ज अवैध ठरले. नांदेडमध्ये महिला मतदारसंघातून कांताबाई बाळासाहेब जोगदंड आणि हिमायतनगरमध्ये महिला मतदारसंघातून रेखाबाई व्यंकटराव फुलारे यांचा अर्ज अवैध ठरला. नागरी सहकारी बँक, पतसंस्था ग्रामीण बिगरशेती ब व इतर मागासवर्गीय सदस्य या दोनही मतदारसंघांतील मोहनराव माधवराव पाटील यांचे अर्ज बाद ठरले आहेत. भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातून नागनाथ सदाशिव सुरनर यांचा अर्ज अवैध ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँक निवडणुकीत १४३ उमेदवारी अर्जांपैकी १७ अर्ज सोमवारी छाननीत अवैध ठरले आहेत. त्यामुळे १२६ अर्ज आता शिल्लक असून, उमेदवारांना ९ मार्चपासून २३ मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. जिल्हा बँकेसाठी २ एप्रिल रोजी मतदान, तर ४ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.

Web Title: 17 applications declared invalid in Nanded District Central Co-operative Bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.