विष्णुपुरी प्रकल्पाचे १७ कोटी ७४ लाखांचे वीज बिल माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:17 AM2021-02-14T04:17:32+5:302021-02-14T04:17:32+5:30
त्याच वेळी सद्य:स्थितीत कृषी वीज पंप धोरण २०२०अंतर्गत व्याज माफ होत असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता ...
त्याच वेळी सद्य:स्थितीत कृषी वीज पंप धोरण २०२०अंतर्गत व्याज माफ होत असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष वहाने यांनी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सब्बीनवार यांच्याशी संपर्क साधला. चर्चेअंती या योजनेअंतर्गत २१ कोटी ७४ लाखपैकी ३ कोटी ९९ हजार रुपये भरल्यास व्याज माफ होण्याचे नवीन देयक पाठविले. त्यानुसार अधीक्षक अभियंता सब्बीनवार व कार्यकारी अभियंता गव्हाणे यांनी अधीक्षक अभियंता वहाणे यांना ३ कोटी ९९ लाखांचा धनादेश सुपुर्द केला. या योजनेअंतर्गत विष्णुपुरी प्रकल्पावरील विद्युत देयकांचे १७ कोटी ७५ लाखांचे व्याज माफ झाले. यावेळी ‘महावितरण’चे तौसिफ पटेल यांचीही उपस्थिती होती. कृषी पंप वीज धोरण २०२० योजनेचा पाटबंधारे विभाग आणि शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.