कोरोना लसीचे १७ हजार ३३० डोस पोलीस बंदोबस्तात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:15 AM2021-01-15T04:15:46+5:302021-01-15T04:15:46+5:30

चौकट----------------- पहिल्या टप्प्यात १७ हजार जणांना मिळणार लसी कोरोना संसर्गावर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने लसीकरणाला महत्त्व आले आहे. पहिल्या ...

17,330 doses of corona vaccine are in police custody | कोरोना लसीचे १७ हजार ३३० डोस पोलीस बंदोबस्तात

कोरोना लसीचे १७ हजार ३३० डोस पोलीस बंदोबस्तात

Next

चौकट-----------------

पहिल्या टप्प्यात १७ हजार जणांना मिळणार लसी

कोरोना संसर्गावर कायमस्वरूपी मात करण्याच्या उद्देशाने लसीकरणाला महत्त्व आले आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, खासगी रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ तसेच कोरोनाविरोधी मोहिमेत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. महापालिकेकडील यासाठी चार हजार ४४६ जणांनी नोंदणी केली असून जिल्ह्यातील एकूण १७ हजार जणांना ही लस देण्यात येणार आहे.

अशी असणार आहे लसीकरणाची मोहीम

नांदेड जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले लसीचे १७ हजार ३३० डोस २ ते १८ डिग्री या तापमानामध्ये साठविण्यात आले आहेत. शनिवारी ज्या व्यक्तींनी लस टोचून घेण्यासाठी नोंदणी केली आहे, अशा व्यक्तींना मोबाईलवर संदेश देण्यात येणार आहे. हा संदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित लस केंद्रावर १६ जानेवारी रोजी जाऊन सदर व्यक्ती तो संदेश दाखवायचा आहे. त्यानंतर संबंधित यंत्रणा आधारकार्ड, पॅनकार्ड व ओळखपत्राची खातरजमा केल्यानंतर लसीचा पहिला डोस देणार आहे.

Web Title: 17,330 doses of corona vaccine are in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.