जिल्ह्यात १९ लाख १४ हजार टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:19 AM2021-04-23T04:19:11+5:302021-04-23T04:19:11+5:30
प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाईन ...
प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या जिल्ह्यातून गाळप हंगाम २०२०-२१ साठी २६ कारखान्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यामध्ये १७ खासगी तर ९ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता. आजपर्यंत २५ कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. यामध्ये १० सहकारी तर १५ खासगी कारखान्याचा समावेश होता. या २५ कारखान्यांनी मार्च अखेर ९२ लाख ५६ हजार ६८४ टन उसाचे गाळप केले आहे. तर ९२ लाख २८ हजार ६८५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.९७ आहे. सध्या गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. नांदेड विभागातील २५ पैकी १५ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. ऊस संपत आल्यामुळे १० कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
नांदेड विभागात सर्वाधिक गाळप व साखर उताऱ्यात परभणी जिल्ह्यातील बळीराजा साखर कारखाना कानडखेड ता. पूर्णा, हा खासगी कारखाना प्रथम आहे. या कारखान्याचे मार्च अखेर ६ लाख ४५ हजार ३४५ टन उसाचे गाळ केले असून ७ लाख ३० हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
चौकट-नांदेड जिल्ह्यात सहा कारखाने असून या कारखान्यात १९ लाख १४ हजार ४६४ टन गाळप झाला असून १८ लाख ४५ हजार १२५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.