जिल्ह्यात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २ टक्के डोस वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:17 AM2021-01-21T04:17:15+5:302021-01-21T04:17:15+5:30
नांदेड : बहुप्रतीक्षित कोरोनाच्या लसीकरणाला देशभरात सुरुवात करण्यात आली आहे. नांदेडातही १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली ...
नांदेड : बहुप्रतीक्षित कोरोनाच्या लसीकरणाला देशभरात सुरुवात करण्यात आली आहे. नांदेडातही १६ जानेवारीपासून पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. जिल्ह्यात पाच केंद्रांवर १७ हजार ९९ जणांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती. परंतु, पहिल्या दिवशी अवघ्या २६२ जणांना ही लस देण्यात आली. त्यातही जवळपास दोन टक्के डोस हे वाया गेल्याचा अंदाज आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी निवड करण्यात आली. जिल्ह्यात त्यासाठी पाच केंद्रे स्थापन करण्यात आली होती. प्रत्येकाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली होती. तसेच ओळख पटल्यानंतरच त्यांना लसीकरण कक्षात सोडण्यात येत होते. नांदेड जिल्ह्याला पहिल्या दिवशी ५०० जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु, हे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची प्रतीक्षा आहे.