वीज कर्मचाऱ्यांच्या वारसांना २० लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:14+5:302021-06-19T04:13:14+5:30
११ सप्टेंबर, २०१९ ते ६ ऑक्टाेबर, २०२० या कालावधीत मयत झालेल्या महापारेषणमधील मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना २० लाखांची मदत ...
११ सप्टेंबर, २०१९ ते ६ ऑक्टाेबर, २०२० या कालावधीत मयत झालेल्या महापारेषणमधील मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना २० लाखांची मदत गट मुदत जीवन विमा याेजनेचा लाभ म्हणून दिली जाणार आहे. तिन्ही कंपन्यांमधील वेतन पुनर्निर्धारण करार ११ सप्टेंबर, २०१९ राेजी करण्यात आला. त्यानुसार, कंपन्यामधील कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी २० लाखांची गट विमा याेजना नव्याने सुरू करण्याकरिता निर्णय घेण्यात आला हाेता. ७ ऑक्टाेबर, २०२० ते ६ ऑक्टाेबर, २०२१ या कालावधी करीता विमा लागू करण्यात आला. २७ ऑक्टाेबर, २०२० राेजी त्या संबंधिताचा आदेश जारी करण्यात आला हाेता. ११ सप्टेंबर, २०१९ ते ६ ऑक्टाेबर, २०२० या कालावधीत अपघात, नैसर्गिक मृत्यू किंवा काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे. तिन्ही कंपन्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापारेषण या संबंधीचे आदेश जारी केले आहेत.