शाळेतील २०० विद्यार्थी बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:17 AM2018-02-21T00:17:04+5:302018-02-21T00:17:14+5:30
मुगाव (ता. नायगाव) येथील माध्यमिक विद्यालयावरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेचे विद्युत दाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रार्थनेला उभ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरसी फाटा : मुगाव (ता. नायगाव) येथील माध्यमिक विद्यालयावरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेचे विद्युत दाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी प्रसंगावधान राखून प्रार्थनेला उभ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे यांनी तातडीने शाळेला भेट दिली. याशिवाय नायगाव, देगलूर व नांदेड येथील महावितरणच्या अधिकाºयांना फोनवरुन घटनेची माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक शिवपुजे यांनी सांगितले, हा प्रकार काही नवीन नाही.
याअगोदर तब्बल चारवेळा तारा तुटल्या होत्या. मात्र विद्युत प्रवाह चालू नसलेल्या बाजूने तुटल्याने फारशे गांभीर्याने कोणी घेतले नाही. प्रत्येक वेळी तुटलेल्या तारा जोडण्याचेच काम चालू आहे. शाळेवरच्या तारा बाजूला काढण्या -संदर्भात मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे. मात्र महावितरण कंपनी गांभीर्याने घेत नाही.
मी क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थी बाजूला घेतले. थोडा तरी उशीर झाला असता तर काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही, असे शिवपुजे म्हणाले.
४ नायगाव तालुक्यातील मुगाव येथे गुणवंत माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेवरून उच्चदाब क्षमतेची विद्युत दाहिनी गेली. मंगळवार, २० फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान प्रार्थनेसाठी रोजच्या सारखे मुले प्रांगणात उभी होती. प्रार्थना सुरू व्हायच्या वेळीच शाळेवरून गेलेल्या उच्चदाब क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या खांबावर स्पार्किंग होऊन जोरदार आवाज झाला. आवाज होताच प्रसंगावधान राखून मुख्याध्यापक शिवसांब शिवपुजे व शिक्षकांनी प्रार्थना अर्ध्यावर थांबवून सुमारे दोनशे मुलांना तातडीने शाळेच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर आणले. नेमके दुसºयाच क्षणी वीज प्रवाह सुरु असलेली तार प्रांगणासह टिनपत्र्यावर कोसळली. यात विद्यार्थी बालंबाल बचावले. अन्यथा सात कर्मचाºयांसह २०० विद्यार्थ्यांना त्याची झळ बसली असती.