२०१५ उमेदवारी अर्ज वैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:23+5:302021-01-01T04:13:23+5:30

ज्या ग्रामपंचायतीतील नामनिर्देशनपत्र रद्दबातल करण्यात आले त्यांची नावे व संख्या अशी आहे. चैनपूर- १, अंतापूर- १, कावळगड्डा- २, ढोसणी- ...

2015 candidature application valid | २०१५ उमेदवारी अर्ज वैध

२०१५ उमेदवारी अर्ज वैध

Next

ज्या ग्रामपंचायतीतील नामनिर्देशनपत्र रद्दबातल करण्यात आले त्यांची नावे व संख्या अशी आहे. चैनपूर- १, अंतापूर- १, कावळगड्डा- २, ढोसणी- १, रमतापूर- १, वळग- १, तडखेल- १.

दरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने दिलेल्या आदेशानुसार देगलूर ग्रामपंचायतीच्या छाननीच्या दिवशी निवडणूक निरीक्षक मंगेश सुरवसे यांनी देगलूर येथे भेट देऊन छाननी प्रक्रियेची पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना केल्या.

निवडणूक निरीक्षकांनी ग्रामपंचायत निवडणूक काळामध्ये छाननी, चिन्ह वाटप, मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण, प्रचार कालावधीमध्ये अचानकपणे कोणत्याही दिवशी तसेच मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी अशा सहा भेटी द्याव्या, असे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. त्यानुसार सुरवसे यांनी देगलूर येथे भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 2015 candidature application valid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.