देगलूर विधानसभा मतदारसंघात २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:13 AM2021-07-09T04:13:23+5:302021-07-09T04:13:23+5:30

पालकमंत्री चव्हाण यांच्या पुढाकाराने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्यमार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख रुपयांची ...

208 crore road improvement works sanctioned in Deglaur assembly constituency | देगलूर विधानसभा मतदारसंघात २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

देगलूर विधानसभा मतदारसंघात २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

Next

पालकमंत्री चव्हाण यांच्या पुढाकाराने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्यमार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख रुपयांची ४ कामे तर जिल्हा व इतर मार्गांच्या सुधारणेची १७९ कोटी २१ लाख रुपयांच्या २८ कामांचा समावेश आहे. या कामांसाठी निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सदर कामांच्या निविदा तत्काळ काढून सदर कामे प्राधान्याने पूर्ण होणार आहेत. देगलूर-बिलोली मतदारसंघातील सामान्य नागरिकांना या कामांचा मोठा लाभ होणार आहे.

पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये दावणगिर ते लोणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९ कोटी रुपये, बिलोली ते कुंडलवाडी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १५ कोटी रुपये, राज्यमार्ग २६८ वरील पुलाचे बांधकाम अंदाजित खर्च ४ कोटी रुपये, राज्यमार्ग २२५ वर दुभाजकाचे काम अंदाजित खर्च ७५ लाख रुपये, भोकसखेडा ते कावळगाव मार्गाची सुधारणा व कावळगावनजीकच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च १० कोटी रुपये, हिप्परगा ते देगलूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, बल्लूर ते माळेगावमार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.७० कोटी रुपये, प्रमुख जिल्हामार्ग क्रमांक १०६ ते राज्य सीमा तसेच मरतोळी गावातील सीसी रस्ता अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, खुतमापूर ते राज्य सीमामार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५ कोटी रुपये, भुतन हिप्परगा ते भुतन हिप्परगा फाटा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.१० कोटी रुपये, खतगाव ते कोटेकल्लूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २ कोटी रुपये, क्षीरसमुद्र ते बेंबरा तांडामार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ७ कोटी रुपये, येडूर ते मानूरमार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.८६ कोटी रुपये, शिळवणी हाणेगाव ते भुतन हिप्परगा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.३० कोटी रुपये, शहापूर ते करेमलकापूर मार्ग सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३.७८ कोटी रुपये, तुंबरपल्ली ते शिळवणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रुपये, चैनपूर ते शहापूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १.३५ कोटी रुपये, बिलोली शहर वळणरस्ता भूसंपादन अंदाजित खर्च १७ कोटी रुपये, भोसी ते राज्यमार्ग क्र. २२५ पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा अंदाजित खर्च ४ कोटी रुपये, लोहगाव ते किनाळा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रुपये, हुनगुंदा ते शिरसखोड मार्गाच्या सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३५ कोटी रुपये, खैरगाव ते लोहगाव मार्गाची सुधारणा अंदाजित २ कोटी रुपये, डोणगाव खु. ते डोणगाव बु. मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३ कोटी रुपये, बिलोली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४२ वरील गोदावरी नदीच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, बिलोली तालुक्यातील मांजरा नदीवरील पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, कांगठी ते बेळकोमी व रुद्रापूर ते बामणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ८.८५ कोटी रुपये, दुगाव आणि आरळी ते दौर तसेच दौर ते रामा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९.४७ कोटी रुपये, बेटमोगरा ते आळंदी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १२.८० कोटी रुपये, लघूळ ते सगरोळी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५.१० कोटी रुपये ही कामे समाविष्ट आहेत. चव्हाण यांनी देगलूर विधानसभा मतदासंघातील विविध विकासकामांसाठी एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला आहे.

Web Title: 208 crore road improvement works sanctioned in Deglaur assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.