नव्या वर्षात 21 कोटींच्या विकासकामांचा धडाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:57+5:302021-01-03T04:18:57+5:30
रविवारी चार विकासकामांचा शुभारंभ प्रभाग ७, ८ व १८ मध्ये होणार विकासकामे - नांदेड, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे ...
रविवारी चार विकासकामांचा शुभारंभ
प्रभाग ७, ८ व १८ मध्ये होणार विकासकामे
-
नांदेड, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड शहरातील प्रभाग ७, ८ व १८ मधील उपनगरातील रस्ते व नालीबांधकामांसाठी सुमारे २१ कोटींचा निधी देऊन नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच विविध विकासकामांचा धडाका सुरू केला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेंतर्गत प्रभाग क्र. ७ व ८ मधील विकासकामांचा जनता कॉलनीजवळील टी-पॉइंट, गणेशनगर रोड येथे रविवारी सायंकाळी ४ वाजता, तर प्रभाग क्र. १८ मधील विकासकामांचा पक्कीचाळ पोलीस चौकी रस्ता, मार्कंडेय मंदिराजवळ सायंकाळी ६ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी महापौर मोहिनीताई येवनकर राहणार आहेत.
या दोन्ही कार्यक्रमांना काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, नांदेड दक्षिणचे आ. मोहनअण्णा हंबर्डे, नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, उपमहापौर मसूद अहेमद खान, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण समिती सभापती सरिता बिरकले, उपसभापती ज्योत्स्ना गोडबोले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी महापौर दीक्षाताई धबाले, नगरसेविका ज्योती रायबोले, सलिमा बेगम नुरुल्लाखान, संगीता पाटील, दुष्यंत सोनाळे, उमेशसिंह चव्हाण, नागनाथ गड्डम, मुंतजिबोद्दीन मुनिरोद्दीन, अब्दुल फहीम अब्दुल मुनीर, संदीप सोनकांबळे, अब्दुल अलीमखान यांनी केले आहे.
१२ कोटींच्या निधीतून होणारी विकासकामे
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मंजूर केलेल्या २१ कोटींच्या निधीतून प्रभाग ७, ८ व १८ मध्ये विकासकामे होणार आहेत. त्यात डॉ. आंबेडकरनगर कॉर्नर ते जयभीमनगर, राजनगर, मनपाहद्द पुष्पनगर, काबरानगर मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता व आसीसी नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. आंबेडकरनगर पाण्याची टाकी ते गणेशनगर मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता व आरसीसी नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. रमामाता हाऊसिंग सोसायटी ते महात्मा फुले मार्केटपर्यंत सीसी रस्ता आरसीसी नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे, तर प्रभाग १८ मधील पक्की चाळ पोलीस चौकी ते गंगाचाळ ते चुनाल नाला ते स्मशानभूमी ते विपश्यना केंद्रापर्यंतचा रस्ता करण्यात येणार आहे.