कोरोनामुळे देगलूरच्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:20 AM2021-02-11T04:20:01+5:302021-02-11T04:20:01+5:30
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या २६ रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या आता २१ हजार ...
जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्या २६ रुग्णांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या आता २१ हजार ६९० इतकी झाली आहे. बुधवारी घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये मनपाअंतर्गत १७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २, देगलूर १, हदगाव १ आणि खासगी रुग्णालयातील ५ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्क्यावर पोहचले आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४४ टक्क्यावर पोहचले आहे.
जिल्ह्यात सध्या २३७ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील ७ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर झाली आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण गृहविलगीकरणातील आहेत. मनपाअंतर्गत १५५ तर जिल्ह्यातील विविध तालुक्यांतर्गत ३६ रुग्ण घरीच कोरोनावर उपचार घेत आहेत. विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये १४, मुखेड ३, किनवट १, महसूल कोविड केअर सेंटर ३, देगलूर १, हैदराबाद येथे १ आणि खासगी रुग्णालयात १० रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यातील विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७० तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटलमध्ये ९५ खाटा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली.