२३ जणांचा मृत्यू तर १२४६ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:14 AM2021-04-03T04:14:52+5:302021-04-03T04:14:52+5:30
तर ९८३ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ९, मनपा अंतर्गत ...
तर ९८३ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ९, मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ७४३, किनवट ५१, बिलोली १९, हिमायतनगर ८, जिल्हा रुग्णालय ८, उमरी ११, मुखेड १५, अर्धापूर १२, खासगी रुग्णालय ८०, देगलूर २, आयुर्वेदीक रुग्णालय १९, कंधार ६ आणि माहूर येथील २२ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ३३ हजार ६३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
२३ मृतांमध्ये १३ नांदेड शहरातील
कोरोनात आता मृत्यूचे प्रमाण वाढले असून शनिवारी २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यात नांदेड शहरातील तब्बल १३रुग्णांचा समावेश आहे. मयतांमध्ये तामसा ता.हदगांव, अर्धापूर, मुखेड, सरसम ता. हिमायतनगर, सिडको नांदेड, क्रांती नगर नांदेड, भोकर, विवेकनगर नांदेड, कौठा नांदेड, गाडीपुरा नांदेड, शिवाजीनगर नांदेड, निवघा ता.मुदखेड, चौफाळा नांदेड, पिरबुर्हाणनगर नांदेड, सिडको नांदेड, गुरुद्वारा नांदेड, संभाजी नगर हदगांव, डोणगाव ता.मुदखेड, गांधी नगर देगलूर, लातूर फाटा नांदेड, खामगाव ता.लोहा आणि व्यंकटेशनगर नांदेड येथील रुग्णांचा समावेश आहे.