नांदेड जिल्ह्यात २४ लाख मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:46 AM2018-09-02T00:46:30+5:302018-09-02T00:46:55+5:30
जिल्ह्यात १ जानेवारी अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध झालेल्या यादी व त्यानंतर झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षण जिल्ह्यात २४ लाख ६ हजार ८०७ मतदार असून या पुनरिक्षण कार्यक्रमात ३१ हजार २०४ मतदारांची नावे वगळण्यात आली तर १५ हजार २०५ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात १ जानेवारी अर्हता दिनांकानुसार प्रसिद्ध झालेल्या यादी व त्यानंतर झालेल्या संक्षिप्त पुनरिक्षण जिल्ह्यात २४ लाख ६ हजार ८०७ मतदार असून या पुनरिक्षण कार्यक्रमात ३१ हजार २०४ मतदारांची नावे वगळण्यात आली तर १५ हजार २०५ मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १ सप्टेंबर २०१८ ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारत निवडणूक आयोगाने राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र, मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. या मतदार याद्यांमध्ये ज्यांची नावे समाविष्ट नाहीत त्यांना नमुना ६ मध्ये अर्ज करता येतील. मतदार यादीतील नावाबाबत आक्षेप असल्यास नमुना ७ मध्ये अर्ज करुन आक्षेप दाखल करता येईल. तसेच मतदारयादीत असलेल्या नोंदीबाबत दुरुस्ती करायची असल्यास नमुना आठमध्ये आणि एका भागातून दुसऱ्या यादीभागात नोंद स्थलांतरित करायची असल्यास नमुना आठ ‘अ’ मध्ये अर्ज सादर करता येतील. सदर अर्ज मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार त्याचप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे मतदान केंद्रावरही सादर करता येतील. मतदारांच्या सुलभतेसाठी ६६६.ल्ल५२स्र.्रल्ल या संकेतस्थळावर आॅनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी ही ४ जानेवारी २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यात असलेल्या प्रारुप मतदार यादीत ९९.६९ टक्के मतदारांची छायाचित्र आहेत तर ओळखपत्र असणाºया मतदारांची टक्केवारीही ९९.७४ टक्के इतकी आहे.
१ जानेवारी २०१८ च्या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण २ हजार ८३२ मतदान केंद्र आहेत. जवळपास १२३ मतदान केंद्राची वाढ झाली आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपजिल्हाधिकारी(निवडणूक) दीपाली मोतीयाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीची तयारी
१ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत नाव नोंदणी अथवा नाव वगळणी करण्यात येईल. लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही शेवटची संधी राहणार आहे. याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही शनिवारी प्रशासनाच्या वतीने माहिती दिली. नोंदणीसाठी आता मतदारांसह राजकीय मंडळी सरसावतील.