जिल्ह्यात कोरोनाचे नवे २७ रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:17 AM2021-02-10T04:17:53+5:302021-02-10T04:17:53+5:30
जिल्ह्यात ३० जणांना उपचारानंतर बरेे झाल्याने सुट्टी दिली आहे. त्यात विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ६, मनपा अंतर्गत एनआरआय ...
जिल्ह्यात ३० जणांना उपचारानंतर बरेे झाल्याने सुट्टी दिली आहे. त्यात विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ६, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील ११, कंधार ४, किनवट २, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटल १. माहूर १, बिलोली २ आणि खाजगी रुग्णालयातील ३ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात २३९ रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यातील ८ जणांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये विष्णूपुरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ११, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्ये १५, नवी इमारत २, मुखेड ३, किनवट १, महसूल कोविड केअर सेंटर ३, देगलूर २, हैदराबाद येथे १, खाजगी रुग्णालय ७ तसेच मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात १५४ तर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात ४० रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे ५८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २१ हजार ६६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४३ टक्क्या पोहचले आहे. विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १७२ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पीटलमध्यये ७४ खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.