‘एक्साइज’मध्ये दुय्यम निरीक्षकांच्या २८८ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:22 AM2021-08-20T04:22:58+5:302021-08-20T04:22:58+5:30

नांदेड : परवाना प्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करणे, त्या माध्यमातून शासनाच्या तिजाेरीत महसूल जमा करणे, अवैधरित्या हाेणारी दारूची निर्मिती ...

288 vacancies for secondary inspectors in 'Excise' | ‘एक्साइज’मध्ये दुय्यम निरीक्षकांच्या २८८ जागा रिक्त

‘एक्साइज’मध्ये दुय्यम निरीक्षकांच्या २८८ जागा रिक्त

Next

नांदेड : परवाना प्राप्त दारूची अधिकाधिक विक्री करणे, त्या माध्यमातून शासनाच्या तिजाेरीत महसूल जमा करणे, अवैधरित्या हाेणारी दारूची निर्मिती व विक्री राेखण्याची जबाबदारी असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागात (एक्साइज) दुय्यम निरीक्षकांच्या तब्बल २८८ जागा रिक्त आहेत. या जागांवर पदाेन्नती मिळण्याची शेकडाे काॅन्स्टेबलला प्रतीक्षा आहे. एक्साइजमध्ये गेल्या काही वर्षांपासून पदाेन्नतीच झालेली नाही. २१ वर्षे सेवा हाेऊनही काॅन्स्टेबलच्या पदाेन्नतीचा मुहूर्त आयुक्तालयाला साधता आलेला नाही. पाेलीस दलातील उपनिरीक्षकाच्या बराेबरीचे एक्साइजमध्ये दुय्यम निरीक्षक हे पद आहे. तब्बल २८८ जागा रिक्त असल्याने उपलब्ध दुय्यम निरीक्षकांवर कामाचा ताण वाढताे आहे. इकडे एक्साइजमधील काॅन्स्टेबलची या पदावरील बढतीसाठी धडपड सुरू आहे. रिक्त जागांचा अंदाज घेऊन १६० व १२८ अशी एकूण २८८ सेवा ज्येष्ठ काॅन्स्टेबलची पदाेन्नती पात्रता यादी तयार करण्यात आली आहे ; परंतु त्यातील आधी १६० ची यादी काढली जाणार आहे. तसे झाल्यास १२८ च्या यादीला पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दाेन्हीही याद्या एकत्रच काढल्या जाव्यात, असा एक्साइजच्या काॅन्स्टेबलमधील सूर आहे. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप हे २८८ जागांवरील बढतीची एकत्र यादी काढतात का, याकडे नजरा लागल्या आहेत.

चाैकट....

अशा आहेत रिक्त जागा

२८८ पैकी दुय्यम निरीक्षकांच्या सर्वाधिक रिक्त जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत. पुणे ५०, सांगली ११, सातारा २२, काेल्हापूर १९, नगर ३३, साेलापूर २९, औरंगाबाद विभाग २३, बीड ४, उस्मानाबाद ५, परभणी ४, लातूर ३, हिंगाेली १, जालना २, नांदेड १०, ठाणे २०, रायगड ६, रत्नागिरी ४, नंदुरबार ५, धुळे २, जळगाव ११, नाशिक २९, सिंधुदुर्ग ३, आयुक्तालय १, मुंबई शहर १३, मुंबई उपनगर २८, नागपूर २७, चंद्रपूर ६, यवतमाळ ४, अमरावती ४, अकाेला ७, वाशिम १, भंडारा ४, बुलडाणा १, गाेंदिया ३, वर्धा ३, तर गडचिराेली जिल्ह्यात २ जागा रिक्त आहेत. पूर्वी ४०० ची असलेल्या रिक्त पदांच्या या यादीत काही पदे भरली गेली आहेत.

चाैकट....

कार्यकारी पदांवर डाेळा

दुय्यम निरीक्षक पदावर बढती दिल्या जाणाऱ्या २८८ जागांपैकी अवघ्या काहीच जागा कार्यकारी पदावरील आहेत. त्यात तपासणी नाक्यांचाही समावेश आहे. वरकमाईच्या मानल्या जाणाऱ्या या कार्यकारी पदांवर वर्णी लावून घेण्यासाठी पदाेन्नतीच्या यादीतील अनेक काॅन्स्टेबलने आतापासूनच फिल्डिंगही लावली आहे.

Web Title: 288 vacancies for secondary inspectors in 'Excise'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.