३ गुरुजींनो, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा,अन्यथा तुमच्यावर कार्यवाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:08 AM2018-01-07T00:08:16+5:302018-01-07T00:09:21+5:30
वाचन, लेखन व गणित विषयामध्ये मागे असणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीची जबाबादारी शिक्षकांवर आहे. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता दर तीन महिन्याला तपासण्यात येईल, या दरम्यान, विद्यार्थ्यांची गुणवत्ता न वाढल्यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : वाचन, लेखन व गणित विषयामध्ये मागे असणाºया विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीची जबाबादारी शिक्षकांवर आहे. अशा विद्यार्थ्यांची गुणवत्ता दर तीन महिन्याला तपासण्यात येईल, या दरम्यान, विद्यार्थ्यांची गुणवत्ता न वाढल्यास संबंधित शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
तपासणी करावयाच्या शाळांची यादी विभागीय आयुक्त अंतिम करणार आहेत. शाळा ‘सिस्टेमॅटीक रॅण्डम सॅम्पलिंग मेथड’ पद्धतीने निवडली जाणार असून केंद्र व बीट यांच्या संख्येएवढ्या शाळांची निवड केली जाईल. दरमहा २५० शाळांतील २५० वर्ग तपासले जातील. संबंधित केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी तपासणी करुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची नोंद करतील. तपासणी झाल्यानंतर गुणवत्ता सुधारण्यास तीन महिन्यांचा कालावधी दिला जाईल. पुन:तपासणीमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन व गणितीय क्षमतामध्ये वाढ होणे अपेक्षित आहे.
केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी यांनी तपासणीनंतर त्या वर्गाची गुणवत्ता संबंधित शिक्षकाच्या निदर्शनास आणावी, वर्गशिक्षकाने तपासणी केल्यानंतर आपल्या वर्गातील वाचन, लेखन, गणिती क्रियामध्ये मागे असणाºया विद्यार्थ्यांचा विशेष सराव घेऊन पुढील तीन महिन्यांत त्या अपेक्षित क्षमता पूर्ण कशा होतील? याकडे लक्ष द्यावे, तपासणी झालेल्या वर्गाची पुन:तपासणी तीन महिन्यानंतर होणार असल्याने वर्ग शिक्षकांनी तीन महिन्यांत गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
याकामी हयगय करणाºया शिक्षकाविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही केंद्रप्रमुख- शिक्षण विस्तार अधिकारी यांनी प्रस्तावित करावयाची आहे.
हदगाव तालुक्यात एकूण १७ केंद्र असून, त्यातंर्गत १९६ शाळा जिल्हा परिषदेच्या तर ५४ शाळा खाजगी आहेत. या शाळांमधून सुमारे २५ हजार
विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. शिक्षण खात्याच्या संबंधितांनी वेळोवेळी शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासला
असता, अनेक ठिकाणी लेखन, वाचन आणि गणित विषयात विद्यार्थी कच्चे आढळल्याने आता अशा विद्यार्थ्यांची दर तीन महिन्यांची गुणवत्ता तपासली जावून याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात येईल.
तपासणीमध्ये निकृष्ट गुणवत्ता आढळणाºया वर्गशिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे अधिकारही केंद्रप्रमुख, विस्तार अधिकाºयांना राहणार
शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा गौरव विभागीय पातळीवर होईल.