जिल्ह्यात ३ हजार ६५१ बचतगटांनी केली १९ कोटी ९६ लाख बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:54 AM2021-01-08T04:54:23+5:302021-01-08T04:54:23+5:30
मायक्रो फायनान्स घटकामार्फत विविध योजनेसाठी महिला बचतगटांना कर्ज वाटप करण्यात येते. महिला बचतगटदेखील नियमितपणे बँकेत खाते उघडून बचत भरत ...
मायक्रो फायनान्स घटकामार्फत विविध योजनेसाठी महिला बचतगटांना कर्ज वाटप करण्यात येते. महिला बचतगटदेखील नियमितपणे बँकेत खाते उघडून बचत भरत आहे या बचतीच्या आधारावर बँक महिला बचतगटांना कर्जपुरवठा करते. आजपर्यंत बचतगटांनी १९ कोटी ९६ लाख रुपये बचत केली आहे. अंतर्गत कर्जव्यवहार करणाऱ्या गटसंख्या ३ हजार ४०९ आहेत. या गटांना अंतर्गत कर्जाची रक्कम १०९ कोटी ८९ लाख रुपये वाटप झालेली आहे. किंबहुना वसुलीदेखील होत आहे.
उपजीविका घटक योजनेंतर्गत जिल्ह्यामध्ये १६६ दूध डेअरी, शेळीपालन, टेलरिंग याचबरोबर ४५ पशुतर करंजी यागावामध्ये खवा मेकिंग युनिट सुरू आहे. पा गावामध्ये भुसार माल खरेदी-विक्री केंद्र कार्यरत असून ६७५ महिला शेळीपालन व्यवसाय करतात. त्यातून आर्थिक उन्नती साधली आहे.
९९ टक्के कर्जाची परतफेड
महिला बचतगटांना १०९ कोटी ८९ लाख रुपये कर्जाची ९६ टक्के परतेड तर बँक कर्जाची ६९ कोटी ९१ लाख रुपये परतफेड ९९ टक्के आहे. त्यामुळे वसुली अधिक होत आहे.