जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या ३१७ शाळा अद्याप बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:20 AM2021-02-09T04:20:24+5:302021-02-09T04:20:24+5:30
कोरोनाचे रूग्ण संख्या कमी होत असली तरी पालकांच्या मनातून कोरोनाचे भय अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे अनेक पालक आपल्या ...
कोरोनाचे रूग्ण संख्या कमी होत असली तरी पालकांच्या मनातून कोरोनाचे भय अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांचे अर्थचक्र बिघडले आहे. त्यातच अनेक शाळांनी शैक्षणिक शुल्क वाढविले आहे.तसेच स्कुल वाहन चालकांनीही आपल्या भाडे वाढविले आहे. यामुळे पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. शाळेत विद्यार्थ्यांची योग्य काळजी घेतली जात असली तरी पालकांचा यावर विश्वास नसल्याने ते मुलांना शाळेत पाठवित नसल्याचे चित्र आहे.
चौकट- जिल्ह्यातील शाळा सुरू होवून १२ दिवस झाले असून हळू हळू विद्यार्थी संख्या वाढत आहे. विशेषता ग्रामीण भागातील मुले शाळेत येण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या १ हजार ९५२ शाळा सुरू झाल्या असून उर्वरित शाळाही सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड
चाैकट- जिल्ह्यात ४१ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेत विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू वाढत आहे.तर दुसरीकडे शिक्षकांना कोरोना तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले असून शिक्षकांच्या तपासण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत ९ हजार ११२ शिक्षकांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४१ शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण११ हजार ५१६ शिक्षकांची संख्या आहे.
चाैकट- शाळा बंद असल्याचे कारणे
पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या असून नववीते बारावीच्या शाळा नोव्हेंबर २०२० मध्ये सुरू झाल्या आहेत. मात्र अजुनही विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. शाळेत केवळ ३२ टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. पालकांच्या मनातून अद्याप कोरोनाची भीती गेली नसून ते आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. जाेपर्यंत कोरोना पूर्णपणे निघून जाणार नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे पालक सांगताहेत.