राज्यात पाेलीस उपअधीक्षकांच्या ३२५ जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:05+5:302021-09-25T04:18:05+5:30

चाैकट.... काेकण विभागात सर्वाधिक आणि सर्वात कमी २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात उपअधीक्षकांच्या ३२५ जागा रिक्त आहेत. त्यातील सर्वाधिक ...

325 vacancies for Paelis Deputy Superintendents in the state | राज्यात पाेलीस उपअधीक्षकांच्या ३२५ जागा रिक्त

राज्यात पाेलीस उपअधीक्षकांच्या ३२५ जागा रिक्त

Next

चाैकट....

काेकण विभागात सर्वाधिक आणि सर्वात कमी

२४ सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात उपअधीक्षकांच्या ३२५ जागा रिक्त आहेत. त्यातील सर्वाधिक काेकण विभाग क्रमांक २ मध्ये १२४ तर सर्वात कमी ७ जागा काेकण विभाग क्रमांक १ मध्ये रिक्त आहेत. याशिवाय नागपूर ५३, अमरावती ४२, औरंगाबाद ४५, नाशिक १५ तर पुणे विभागात ३९ जागा रिक्त आहेत.

चाैकट....

‘जीएडी’मध्ये फाईलचा संथ प्रवास

१८० पाेलीस निरीक्षकांपैकी अर्धेअधिक निरीक्षक कमाईच्या पाेलीस ठाण्यांचे ठाणेदार आहेत, त्यांच्या सेवानिवृत्तीलाही कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी पदाेन्नती कशी लांबविता येईल यासाठी माेर्चेबांधणी चालविली हाेती. त्यासाठी फाईलींचा प्रवास संथ व्हावा असा त्यांचा प्रयत्न हाेता. गृह विभागातून ही फाईल एका दिवसात सामान्य प्रशासन विभागाला (जीएडी) पाठविली गेली. मात्र जीएडीमध्ये या फाईलला सुमारे तीन आठवडे लागले. ते पाहता दिग्गज निरीक्षक फाईलचा प्रवास जीएडीमध्ये संथ करण्यात यशस्वी झाल्याचे मानले जाते.

Web Title: 325 vacancies for Paelis Deputy Superintendents in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.