वर्षभरात ३४ आरोपी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:00 AM2018-01-07T00:00:41+5:302018-01-07T00:00:45+5:30
जिल्ह्यात सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाºया ३४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे़ तर ८१२ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़ गेल्या वर्र्षभरात दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३४ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यात सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचविणाºया ३४ गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे़ तर ८१२ गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्याकडून तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे़ गेल्या वर्र्षभरात दोषसिद्धीचे प्रमाण वाढून ३४ टक्क्यांपर्यंत गेल्याची माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़
पोलीस अधीक्षक मीना म्हणाले, जिल्ह्यात पाहिजे, फरारी असलेल्या ५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दंगल यासारख्या गुन्ह्यांतही मोठी घट झाली आहे़ दारुबंदीच्या विरोधातील कारवाई तब्बल ८२ टक्क्यांनी वाढली आहे़
शहर वाहतुकीच्या समस्येवर पोलीस अधीक्षक म्हणाले, शहर वाहतुकीचा सर्व ताण एकाच रस्त्यावर येतो़ या रस्त्याला जोडणारे चार ओव्हरब्रीज करण्यात आले़, परंतु शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेण्यात आली नाही़ सुरुवातीपासूनच शहरातील रस्त्यांचा आराखडा चुकीच्या पद्धतीने करण्यात आला़ हजारो वाहने एकाच रस्त्यावर धावतात़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाºयांमध्ये वाढ करुन हा प्रश्न सुटणार नाही़ त्यासाठी मोठ्या व कायमस्वरुपी शस्त्रक्रियेची गरज आहे़
शहरातील सर्व शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्याची गरज आहे़ रस्त्याच्या कडेला असलेला सायकल ट्रॅक काढून रस्त्यांची रुंदी वाढविल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल़ गुरु-त्ता-गद्दीच्या वेळचा १०० कोटी रुपयांचा निधी आता येणार आहे़ त्या निधीतून शहरातील विविध भागांत मल्टीलेवल पार्कींग करण्याची गरज आहे़ रस्त्यावर भरणाºया बाजारामुळेही वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे़ शहरातील विविध भागात रस्त्यावरच बाजार भरतात़ दिवसेंदिवस ते फोफावत चालले आहेत़ सध्या शहर वाहतूक शाखेला अतिरिक्त २५ कर्मचारी आणि चार अधिकारी देण्यात आले आहेत, परंतु कर्मचाºयांची संख्या वाढवून हा प्रश्न सुटणारच नसल्याचेही ते म्हणाले़ शिवाजीनगर उड्डाणपुलावरुन जाणाºया मोर्चांचा मार्ग बदलणे आणि रस्त्यावर भरणारे बाजार याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे, असेही मीना म्हणाले़ वाहतुकीच्या खोळंब्यामुळे आरोपी पकडण्यास मात्र मदत झाल्याचे ते म्हणाले़ न्यायालयात आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण ३४ टक्के राहिले आहे़ संघटित गुन्हेगार, दादागिरी, धोकादायक व्यक्तींच्या विरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे़ रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत ३४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे़ शहरात सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़, परंतु त्याच्या दुरुस्ती आणि देखभालीमुळे अनेकवेळा ते बंदच राहतात़ काही दिवसांपूर्वीच महापालिकेने कॅमेºयांची दुरुस्ती केली होती़, परंतु त्यातील अनेक कॅमेरे पुन्हा बंद पडले़ आता नियोजन समितीमध्ये पोलीस दलासाठी १० टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे़ या निधीतून सीसीटीव्ही कॅमेºयासह इतर विषयांसाठी पोलिसांना निधी मिळणार आहे़ हदगाव तालुक्यातील आष्टी येथे घडलेल्या घटनेत शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप आला नाही़ तो अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे़या घटनेत दोषी कुणीही असो त्याच्यावर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश श्ािंदे, अविनाश बारगळ, पोनि़ संदीप गुरमे यांची उपस्थिती होती़
आॅनलाईन तक्रारीबाबत जनजागृती
डिसेंबर महिन्यात केवळ १७ आॅनलाईन तक्रारी आल्या आहेत़ त्यातील ९ तक्रारींमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़ या तक्रारींची अगोदर चौकशी करण्यात येते़ आॅनलाईन तक्रारींच्या संदर्भाने जनजागृती करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक मीना म्हणाले़
तरुणांना योग्य मार्गदर्शनाची गरज
आज जगात भारत हा सर्वात जास्त तरुणांची संख्या असलेला देश आहे़ या तरुणांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे़ तरुणांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा रोजगाराच्या संधी शोधण्याकडे वळावे़ पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन माध्यमांकडून केले जाते़ त्यामुळे माध्यमांनीही निष्पक्षपणे काम करावे, असेही मीना म्हणाले़