दोन दिवसात ३९ मृत्यू तर २०४८ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:23+5:302021-03-31T04:18:23+5:30

जिल्ह्यात कोरोनाचा गेल्या काही दिवसात हाहाकार सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. ...

39 deaths in two days and 2048 affected | दोन दिवसात ३९ मृत्यू तर २०४८ बाधित

दोन दिवसात ३९ मृत्यू तर २०४८ बाधित

Next

जिल्ह्यात कोरोनाचा गेल्या काही दिवसात हाहाकार सुरु आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. परंतु नागरीक बेफिकीरपणे वागत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढतच आहे. सोमवारी १ हजार ९८ जण बाधित आढळले होते. १९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ६४९जणांनी कोरोनावर मात केली होती. मंगळवारी त्यामध्ये आणखी वाढ होवून २० जणांचा मृत्यू झाला. ९५० बाधित आढळले. आरटीपीसीआर तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २५३, मुदखेड १३, लोहा २५, मुखेड ३२, नांदेड ग्रामीण २५, देगलूर १४, नायगांव १०, हिंगोली ४, धर्माबाद २, हदगांव १८, अर्धापूर ८, परभणी १, कंधार ८, किनवट २६, भोकर ८, पंढरपूर १ तर ॲटीजेन तपासणीत नांदेड ग्रामीण १०, देगलूर १४, किनवट २१, नायगांव १, अर्धापूर ५, धर्माबाद १, लोहा २६, उमरी ४, भोकर १६, हदगांव २, माहूर ३ आणि परभणी येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी प्रशासनाला २ हजार ५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. आजघडीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २५२, जिल्हा रुग्णालय ८२, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ९०, आयुर्वेद रुग्णालय १०४, किनवट १०९, मुखेड २५४, देगलूर ३६, बिलोली ३२, नायगांव ७६, उमरी ३६, माहूर १२, भोकर ४, हदगांव ५५, हदगांव ६६, लोहा ९९, कंधार ३३, महसुल भवन १६३, हिमायतनगर १५, धर्माबाद ५६, मुदखेड ११, अर्धापूर ३३, बारड २, मांडवी २१, मनपा अंतर्गत गृहविलगीकरण व एनआरआय ५ हजार ९४४, ग्रामीण भागातील गृहविलगीकरण १ हजार ७३९, खाजगी रुग्णालय ५९७ आणि लातूर येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले आहे. तर ७८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

सोमवारी गाडीपूरा नांदेड, सहयोगनगर नांदेड, यशनगर, तरोडा, कंधार, रेणुका देवी मंदिर नांदेड, धर्माबाद, आंबेडकर नगर, सिडको, दत्तनगर, मालेगाव राेड, महावीर चौक, उमरी, काबरा नगर, अशोक नगर, लोहा, मालेगाव रोड तर मंगळवारी धनेगाव, बाबानगर, खोब्रागडे नगर, दत्तनगर, स्वागत नगर, माहूर, सिडको, वाजेगाव, सप्तगिरी कॉलनी, भाग्यनगर, गोर्वधन घाट, विष्णूनगर, कैलाश नगर, सराफा, वाघी, आंबेडकरनगर, लोहा आणि कलामंदिर येथील ३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७७० जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 39 deaths in two days and 2048 affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.